समाजाचा वापर करू इच्छिणार्‍या राहुल गांधींचा निषेध : जय भीम आर्मी

    24-Dec-2024
Total Views | 46
Rahul Gandhi And Nitesh More

परभणी : ( Parbhani ) “सोमानाथ सूर्यवंशी दलित असल्यामुळे त्याला मारहाण झाली, असे वक्तव्य करणार्‍या राहुल गांधी यांचा तीव्र निषेध करत आहे,” असे ‘जय भीम आर्मी’ने जाहीर केले आहे. ‘जय भीम आर्मी’च्यावतीने सांगण्यात आले आहे की, “देशात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे राज्य आहे. संविधानाच्या राज्यात जातिभेदाला मुठमाती देण्यासाठी सर्व भारतीय समाज एकत्रितरित्या काम करत आहेत. सोमनाथ सूर्यवंशी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र, त्यांच्या मृत्यूचे राजकारण करून परभणी आणि पर्यायाने महाराष्ट्रात जातीय द्वेष पसरवण्यासाठी राहुल गांधी परभणीत आले आहेत, असे वाटते.”

काँग्रेसने आयुष्यभर जातीयवाद करून आमच्या डॉ. बाबासाहेबांचा दुस्वास केला. समाजातील तरुणाईचा कायम वापर केला. आज समाज प्रगती करत असताना राहुल गांधी पुन्हा दलित आणि दलितेतर वाद चिघळवण्याचा प्रयत्न करत आहेत. राहुल गांधी यांचा ‘जय भीम आर्मी’कडून आणि न्याय-हक्क प्रस्थापित करून प्रगती करणार्‍या बौद्ध समाजाकडून तीव्र निषेध.

नितीन मोरे, अध्यक्ष, जय भीम आर्मी

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121