‘गदर ३’ मध्ये नाना पाटेकर झळकणार? नाना म्हणाले, “मी आणि सनी देओल....”

    24-Dec-2024
Total Views | 61
 
nana patekar
 
 
मुंबई : अनिल शर्मा दिग्दर्शित गदर चित्रपटाने भारतीय प्रेक्षकांना भूरळ पाडली आहे. गदर १ आणि गदर २ या दोन्ही चित्रपटातील सनी देओल यांच्या अभिनयाची जादू आजही कायम आहे. दोन्ही चित्रपटाच्या यशानंतर लवकरच गदर ३ येणार असेही सांगितले जात आहे. आणि या तिसऱ्या भागात नाना पाटेकर दिसणार अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. तसेच, नुकताच अनिल शर्मा दिग्दर्शित वनवास हा चित्रपट प्रदर्शित झाला. यात अभिनेते नाना पाटेकर प्रमुख भूमिकेत होते.
 
तर, गदर ३ या चित्रपटात नाना पाटेकर खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असे म्हटले जात आहे. याबद्दल नाना पाटेकर यांना प्रश्न विचारला असता त्यांनी यावर उत्तर दिले आहे. नाना पाटेकर यांनी 'द लल्लनटॉप'या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी नाना म्हणाले की, “मी खलनायकाच्या भूमिकेत असताना सनी देओल मला मारतोय, हे तुम्ही पाहू शकाल का? त्यामुळेच इच्छा असूनही काही भूमिका वठवल्या जाऊ शकत नाहीत. आम्ही दुसरा एखादा चित्रपट करू. मारामारीच्याच चित्रपटात आम्ही एकत्र काम करावं, असं काही नाही. आम्ही आणखी एखाद्या दुसऱ्या चित्रपटात सोबत काम करू”, असं नाना पाटेकर यांनी स्षष्ट केलं होतं.
 
पुढे ते म्हणाले की, “अनिल शर्मा हे मोठे दिग्दर्शक आहेत. ते चित्रपट फार चांगल्या पद्धतीने सजवतात”. तर गदरचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी देखील नाना पाटेकर यांच्या गदर ३ चित्रपटातील भूमिकेविषयी भाष्य केलं. ते म्हणाले की, “माझी नाना पाटेकर यांच्यासोबत एक-दोन वेळा चर्चा झालेली आहे. गदर ३ चित्रपटात त्यांच्यासाठी भूमिका द्यावी, अशा स्थितीत सध्या चित्रपट नाही. पण या चित्रपटात कुठे जागा मिळाली, संधी भेटली, नाना पाटेकर यांना शोभणारे पात्र ठरले तर त्यावर विचार केला जाईल”, असे अनिल शर्मा यांनी सांगितले. त्यामुळे सध्यातरी गदर ३ मध्ये नाना पाटेकर दिसणार नाही हे स्पष्ट झाले आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121