महिलांना २१०० रूपये मिळणार, तर ६० वर्षांवरील वृध्दांना मोफत उपचार
महायुती सरकारच्या योजनांची अंमलबजावणी करतंय केजरीवाल सरकार
23-Dec-2024
Total Views | 44
नवी दिल्ली : आम आदमी पार्टीने ( AAP Govt. ) दिल्लीतील महिला आणि वृद्धांसाठी दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत. महिलांना २१०० रुपये प्रति महिना आणि ६० वर्षांवरील वृद्धांना सरकारी आणि खाजगी रुग्णालयात सर्व प्रकारचे मोफत उपचार देण्याची घोषणा पक्षाने केली आहे. या दोन्ही घोषणांसाठी २३ डिसेंबरपासून नोंदणी सुरू झाली आहे. 'आप'चे राष्ट्रीय संघटक अरविंद केजरीवाल यांनी याची घोषणा केली.
दिल्लीमध्ये सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. प्रत्येक पक्ष निवडणूक जिंकण्याच्या उद्देशाने मतदारांसाठी वेगवेगळ्या योजना आखत आहेत. आम आदमी पार्टीने दिल्लीतील महिलांसाठी मार्च २०२४ दरम्यान 'महिला सन्मान योजना' आणली होती. या योजनेमध्ये महिलांना १००० रुपये देण्यात येत होते. आता त्यात बदल करुन निवडणुकीदरम्यान पुन्हा या योजनेचा अवलंब करण्यात येणार आहे. यामध्ये महिलांना दर महिना २१०० रुपये मिळणार आहेत. यासोबतच ६० वर्षांवरील वृध्दांना सरकारी व खाजगी रुग्णालयात सर्व प्रकारचे उपचार मोफत स्वरुपात देण्यात येणार आहेत.
या दोन्ही योजनांची नोंदणी २३ डिसेंबरपासून सुरु होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या योजनांची अंमलबजावणी मात्र निवडणुकीनंतर करण्यात येणार आहे.