मुंबई : ( Kurla ) बसचे ब्रेक फेल गेल्याने हा अपघात घडला असा दावा बसचालक संजय मोरे याने केला आहे. मात्र, इलेक्ट्रिक बसचे ब्रेक कधीच फेल होत नाहीत असा तर्क तज्ज्ञांनी काढला आहे. त्यामुळे आता बसचालक खोटे तर बोलत नाही ना?, असा प्रश्नही आता उपस्थित केला जाऊ लागला आहे. सोमवार दि. ९ डिसेंबर रोजी रात्री कुर्ल्यात भरधाव बेस्ट बसने अनेकांना चिरडले. बसचालक संजय मोरेची नियुक्ती १ डिसेंबर रोजीच झाली होती. या बेस्ट बसचालकाला कंत्राटावर घेतले होते. त्याला यापूर्वी बस चालवण्याचा अनुभव नव्हता. या अपघातानंतर आरोपीवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
मुंबईतील कुर्ला पश्चिम रेल्वेस्थानकाजवळील आंबेडकर नगर येथे सोमवारी ( ९ डिसेंबर ) रात्री बसचा भीषण अपघात झाला. या बसने रस्त्यावरुन चालणाऱ्या लोकांना व वाहनांना चिरडले. या अपघातात एकूण ४९ जण जखमी तर, ७ जणांचा मृत्यू झाला आहे. या बेस्ट बसचा चालक संजय मोरे ( वय ५४ ) याची बसचालक म्हणून १ डिसेंबर रोजीच नियुक्ती झाली होती. या बसचालकाला कंत्राटावर घेतले होते. आरोपीला बस चालवण्याचा पूर्वीचा कोणताच अनुभव नव्हता. कुर्ला रेल्वे स्थानक हा भाग वर्दळीचा भाग असल्याने बस चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि ही घटना घडली. पोलिसांनी बसचालकावर एफआयआर दाखल केला आहे.
बस पावणे दहाच्या सुमारास कुर्लायेथून साकीनाकाकडे जात होती. अचानक बस वेगवान झाली आणि हा अपघात घडला. या घटनेनंतर स्थानिकांनी जखमींना त्वरित जवळच्या रुग्णालयात दाखल केले. ही घटना घडली तेव्हा बसमध्ये सुमारे ६० प्रवासी होते. या घटनेत तीन पोलिस आणि महाराष्ट्र सुरक्षा दलाचा एक जवान जखमी झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक प्रशांत चव्हाण हेही जखमी झाले, तर २०-२५ वाहनांचे संपुर्णतः नुकसान झाले.