"तुतारीची सुपारी घेऊन जरांगेंनी..."; प्रसाद लाड यांचा घणाघात
04-Nov-2024
Total Views | 130
मुंबई : तुतारीची सुपारी घेऊन मनोज जरांगेंनी आजचा निर्णय जाहीर केला असून तो महाविकास आघाडीला मदत करण्याच्या दृष्टीने घेतला आहे, असा घणाघात भाजप नेते प्रसाद लाड यांनी केला आहे. मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणूकीतून माघार घेतली. यावर प्रसाद लाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी संवाद साधला.
प्रसाद लाड म्हणाले की, "हे आम्हाला अपेक्षितच होतं. मनोज जरांगेंची नौटंकी ही आजची नाही तर मागचे सात-आठ महिने मराठा समाज ही नौटंकी पाहतो आहे. तुतारीची सुपारी घेऊन मनोज जरांगेंनी ज्यापद्धतीने आजचा निर्णय जाहीर केला, हा संपूर्णपणे शरद पवार आणि महाविकास आघाडीला मदत करण्याच्या दृष्टीने घेतला आहे. मराठा समाजाशी धोका करून त्यांना खोटं पाडण्याचं काम त्यांनी केलं, असे ते म्हणाले."
ते पुढे म्हणाले की, "माध्यमांसमोर खोटे अश्रू दाखवून ज्यापद्धतीने जरांगे मराठा समाजाचं नुकसान करत आहेत याचा अर्थ ते राजकारण्यांपेक्षाही वाईट राजकारण करण्याचं काम करत आहेत. राजकारणी लोकं फसवतात असा आरोप ते करतात. आज खऱ्या अर्थाने महायूती सरकारनेदेखील मराठा समाजाच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला. पण मनोज जरांगेंनी समाजासोबत गद्दारी केली आहे," अशी टीकाही त्यांनी केली.