मशिदीत लपून बसलेल्या दहशतवाद्यांवर इस्त्रायलचा हल्ला

हिजबुल्लाह संघटनेविरोधात कारवाई

    06-Oct-2024
Total Views | 123

Israel Attack
 
बेरूत : इस्लामी दहशतवाद्यांविरोधात इस्त्रायलच्या कारवाईत आक्रमकता वाढली आहे. गाझा पट्टीत हमास आणि लेबनॉनच्या हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेविरोधात कारवाई करतेवेळी जोरदार बॉम्बस्फोट करण्यात आला होता. या कारवाईत हमासचे २१ दहशतवादी मारले गेले आहेत. हे दहशतवादी एका मशिदीत लपून बसले होते. या हल्ल्यात मशिदीसह इतर इमारतीही उद्ध्वस्त झाल्या आहेत.
 
इस्त्रायलच्या लष्कराचे म्हणणे आहे की, काही वेळाआधी दहशतवाद्यांना अचूक लक्ष्य केले गेले होते. वास्तविक, मध्य गाझा पट्टीतील देऱ अल-बालाह येथील इब्न रूश्द शाळेच्या आवारात हमासचे कमांड सेंटर होते आणि त्यात हे मध्य गाझा पट्टीतील देर अल-बालाह येथील इब्न रूश्द शाळेच्या आवारात हमासचे कमांड सेंटर होते आणि त्यात हे दहशतवादी उपस्थित होते. शुहादा अल-अक्सा मस्जिद नावाच्या अल-बालाहमधील दुसऱ्या हमास नियंत्रण केंद्रालाही लक्ष्य करण्यात आले.
 
इस्त्रायल लष्करांनी सांगितले की, कमांड सेंटरचा वापर हमासने आयडीएफ सैन्य आणि इस्त्रायलविरोधात दहशतवादी हल्ल्याची योजना आखण्यासाठी आणि अंमलबजावणी करण्यासाठी केला होता, आयडीएफचे म्हणणे आहे की, हल्ल्यातील नागरी जीवितहानी कमी करण्यासाठी अनेक उपाय योजण्यात आले होते, ज्यात अचूक शस्त्रे आणि पुष्टी केलेल्या गुप्तचरांचा जीवितहानी कमी करण्यासाठी अनेक उपाय योजण्यात आले होते. ज्यात अचूक शस्त्रे आणि पुष्टी केलेल्या गुप्तचरांचा समावेश आहे.
 
त्याचवेळी इस्त्रायली लष्कराने लेबनॉनची राजधानी बेरूतच्या उपनगरांवरही बॉम्ब हल्ला केला आहे. इस्लामिक माध्यमाने हाऊस अल जझीराने दिलेल्या माहितीनुसार, या क्रॅकडाऊनमुळे बेरूतमध्ये प्रचंड स्फोट झाले. वृत्तवाहिन्यांच्या मते, इस्त्रायलने बेरूत येथे एका रात्रीत ३० हून अधिक हल्ले केले.
 
आयडीएफने ट्विटवरील एका पोस्टमध्ये एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, त्यांच्या युद्धविमानांनी बेरूतमधील अनेक हिजबुल्लाह
शस्त्राने आणि इतर पायाभूत सुविधांवर हल्ला केला. या हल्ल्याबाबत परिसरात नागरिकांना आधीच सावध केले.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121