रवी राजा यांच्या पक्षप्रवेशावेळी फडणवीस यांचा खळबळजनक दावा
31-Oct-2024
Total Views |
मुंबई : रवी राजा यांनी मुंबई महापालिकेसाठी लक्षवेधी काम केले आणि मतदारसंघातून तिकीट न दिल्याने ते नाराज आहेत. त्यांना सायन कोलिवाडा विधानसभा मतदारसंघातून तिकीट न दिल्याने ते नाराज होते. त्यामुळे आता त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित ३१ ऑक्टोबर रोजी पक्षप्रवेश केला. याचपार्श्वभूमीवर आता देवेंद्र फडणवीस यांनी बड्या राजकीय भूकंपाचे संकेत दिले आहेत. त्यांनी रवी राजा यांच्या पक्षप्रवेशावेळी काँग्रेसचे अनेक नेते हे भाजपच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी रवी राजा यांच्या पक्षप्रवेशावर भाष्य केले आहे. ते म्हणाले की, रवी राजा यांच्यासारख्या मातब्बर नेते आहेत. ते महापालिकेचे विरोधी पक्षनेते होते. ते २३ वर्षे बेस्टचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले होते. बेस्ट संदजर्भात पालिकेत रवी राजा यांच्याकडे ऑथेरिटी म्हणून बघितलं जात. जनसंपर्क असलेला नेता काँग्रेस नेत्याशी त्यांचे चांगले संबंध आहेत. आम्हाला विधानसभेत रवी राजा यांचा मोठा फायदा होईल असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
रवी राजा यांच्या अनुभवाचा फायदा भाजपला मिळेल. रवी राजांच्या संपर्कात अनेक काँग्रेस नेते आहेत. त्याचा फायदा हा येत्या काळात भाजपला होईल. फक्त त्यांची नावे आज विचारू नका असे मिश्कील भाष्य भाजपने केले आहे. ज्यावेळी पक्षप्रवेश होईल तेव्हा सांगेल असे फडणवीस म्हणाले आहेत.
राज्यात महायुतीचे सरकार येणार असल्याने लोकांमध्ये सकारात्मकता दिसून येत आहे. तसेच त्यांनी बोलत असताना काही ठिकाणी आलेल्या क्रॉस फॉर्म आले होते. त्याबाबत शिंदे यांच्या घरी बैठक झाली. अजितदादा, बावनकुळे, तटकरे आणि प्रफुल्ल पटेल होते. त्यावेळी सर्व निर्माण झालेली समस्यांचे निराकरण केले. यावेळी भरले गेलेले विनातिकीटाचे सर्व अर्ज मागे घेतले जातील, असे देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे.