राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार
12-Oct-2024
Total Views | 31
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करण्यात आरल्याची घटना वांद्रे येथे घडली. झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयाबाहेर दसऱ्या दिवशी शनिवारी १२ ऑक्टोबर रोजी गोळीबार करण्यात आला होता.
यावेळी ३ अज्ञातांनी तोंडाला रूमाल बांधून गोळीबार केल्याची धक्कादायक घटना आहे. यामध्ये दोघेजण पोलिसांच्या ताब्यात असून एकजण फरार असल्याची माहिती आहे. याप्रकरणी पोलीस आरोपीचा तपास घेत आहेत.
काही दिवसांआधी बाबा सिद्दिकी यांना धमकी आली होती. याप्रकरणी त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. बाबा सिद्दिकी हे केवळ राजकारणातचनाहीतर बॉलिवूड क्षेत्रातही त्यांची ओळख होती. दरम्यान याप्रकरणी वांद्रे पूर्व भागात आणि लिलावती रुग्णालय भागात कडेकोट बंदोबस्त आहे. याप्रकरणी पोलिस पुढील तपास करत आहेत.