होमियोपॅथी ही गरोदर स्त्रियांसाठी एक वरदानच आहे. गरोदरपणा आणि प्रसूतीपूर्व व नंतरच्या काळात होमियोपॅथी ही अत्यंत सुरक्षित औषधप्रणाली मानली जाते. गरोदपणातील काही लक्षणांवर होमियोपॅथीची औषधे जलदपणे व सुरक्षितरित्या काम करतात. एवढेच नव्हे, तर नुकत्याच जन्मलेल्या बाळासाठीसुद्धा होमियोपॅथीची औषधेही गुणकारी व सुरक्षित असतात.
असे पाहण्यात आले आहे की, इतर काही औषध शास्त्रात बहुतांश औषधे ही गरोदरपणात घेता येत नाहीत. शारीरिक तसेच मानसिक आजारांवरची औषधेसुद्धा गरोदरपणात घेण्यास मज्जाव करण्यात येतो. कारण, या औषधांचे खूप वाईट परिणाम स्त्रियांवर व गर्भावर होत असतात, ही औषधे जर चालू असतील, तर बाळाच्या निरोगी वाढीवर त्याचा थेट परिणाम होता व बाळामध्ये शारीरिक अथवा मानसिक व्यंग येऊ शकते, अशावेळी होमियोपॅथी स्त्रियांच्या मदतीला धावून येते. होमियोपॅथीचीा औषधे ही पूर्णतः नैसर्गिक तत्त्वांवर व नैसर्गिक पदार्थापासून बनवलेली असल्यामुळे व पोटेटायझेशन केल्यामुळे या औषधांचा कुठलाही दुष्परिणाम होत नाही व त्वरित काम करत असल्याने, स्त्रियांना त्याचा फायदा होतो.
या व्यतिरिक्त असे आढळून आले आहे की, ज्या स्त्रिया गरोदरपणात किंवा त्यांच्या अगोदरपासून जर होमियोपॅथीक औषधे घेत असतील, तर अशा स्त्रियांची प्रसूती अतिशय सुलभ होते. हल्लीच्या काळात प्रसूतीच्या वेळी बहुतांश वेळा सिझेरीयन सेक्शन करून प्रसूती केली जाते. हे सिझेरीन टाळण्यासाठी बाळाची व्यवस्थित वाढ होणे गरजेचे असते. त्याचबरोबर बाळाची प्रसूतीच्या वेळची गर्भाशपातील स्थितीसुद्धा महत्त्वाची असते. त्याचबरोबर गर्भजल किंवा नाळ यांची स्थितीसुद्धा महत्त्वाची असते. त्याचबरोबर गरोदर स्त्रियांचे आरोग्य तिची प्रसूती वेदना सहन करण्याची क्षमता हे सर्व घटक महत्त्वाचे असते. अशावेळी होमियोपॅथिक औषधे चालू असतील, तर स्त्रियांना त्याचा अतिशय फायदा होतो. सिझेरीयन टाळून नॉर्मल डिलिवरी होण्यासाठीसुद्धा होमियोपॅथीमध्ये औषधे दिली गेलेली आहेत. स्त्रियांची प्रसूती कळा सहन करण्याची क्षमतासुद्धा वाढते.
गर्भाशयातील बाळाची वाढ व घडामोडी या अकल्पित असतात. बाळामध्ये येणारे दोष हे जनुकीय (जेनेटिक) असतात. बाळाची निरोगी वाढ बर्याच गोष्टींवर अवलंबून असते. जसे मातेची मानसिक स्थिती मातेला असलेले मानसिक व शारीरिक ताण तणाव, गरोदरपणात किंवा गरोदरपणाच्या अगोदर मातेला असलेले व ती घेत असलेली औषधे याचा बाळाच्या वाढीवर सतत परिणाम होत असतो. उदा. गर्भारपणात येणारा किंवा आधीपासून असणारा उच्च रक्तदाब, मधुमेह, थायरॉईट ग्रंथीचे विकार श्वसनाचे विकार जसे दमा यामुळे बाळाच्या वाढीवर परिणाम होतो. त्याचबरोबर काही संप्रेरके तसेच वेदनाशामक औषधे किंवा काही स्टीरॉईड्स आणि अँटीबायोटिक्स यामुळे बाळाच्या वाढीवर विपरित परिणाम होत असतो.
जर स्त्रियांनी होमियोपॅथीची औषधे घेतली, तर वरील सर्व दुष्परिणाम हे यशस्वीरित्या टाळता येतात. होमियोपॅथीच्या तत्त्वानुसार व्यवस्थित केस टेकांग करून दिले गेलेले औषध हे मातेसाठी व बाळासाठी उपयुक्त ठरते व निरोगी व कुठलेही व्यंग नसलेले बाळ जन्माला येते.
या औषधा व्यतिरिक्त डॉ. हॅनेमान यांनी गर्भारपणात घेणाच्या आहाराविषयीसुद्धा मार्गदर्शन केले आहे. आहार, विहार, आचार व विचार यांची मागसावर सतत परिणाम होत असतो व त्याची जडणघडणच तशी होत असते. गर्भारपणात तर स्त्रियांचा दोन जीवांची काळजी घ्यायची असते. पुढील भागात आपण गर्भारपणातील होमियोपॅथीच्या उपयोगाची अजून माहिती जाणून घेऊ. (क्रमश:)
डॉ. मंदार पाटकर
(लेखक एमडी होमियोपॅथी आहेत.)
९८६९०६२२७६