विजय चौकात निनादले स्वातंत्र्यवीरांचे ‘जयोस्तुते’

‘बिटींग द रिट्रीट’ सोहळ्यात भारतीय लष्कराकडून वादन

    29-Jan-2024
Total Views | 202
Beating the Retreat on Rajpath

नवी दिल्ली  : यंदाच्या बिटींग द रिट्रीट सोहळ्यामध्ये भारतीय लष्कराच्या बँडकडून स्वातंत्र्यवीर सावरकर रचित ‘जयोस्तुते’ या गीताचे वादन प्रथमच करण्यात आले. भारताच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याची सांगता दरवर्षी देशाची राजधानी दिल्लीतील विजय चौकात होते. त्यामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना तिन्ही सेनादलातर्फे मानवंदना दिली जाते.

त्यासाठी भारतीय लष्कर, नौदल आणि हवाईदलाचे विविध बँड्स विविध गीतांद्वारे मानवंदन देतात. या कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्यासह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह व अन्य मंत्री उपस्थित होते.
 
यंदाच्या वर्षी सोमवारी झालेल्या कार्यक्रमास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासमोर भारतीय लष्कराच्या मिलिटरी बँडतर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर विरचित ‘जयोस्तुते’ या गीताचे वादन करण्यात आले. यावेळी भारतीय लष्कराच्या मिलिटरी बँडने चांद्रयान या रचनेमध्ये उभे राहून ‘जयोस्तुते’ गीताचे वादन केले. विशेष म्हणजे राजपथावर प्रथमच स्वातंत्र्यवीरांचे गीत वाजवण्यात आले आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121