लखनऊ : उत्तर प्रदेशातील सहारनपूरमधील एका कुटुंबाला इस्लाम धर्म स्वीकारण्याची धमकी दिली जात आहे. त्याच्या परिसरात बहुतांश मुस्लिम लोक राहतात. त्यामुळे ते या कुटुंबावर जमीन सोडण्याची किंवा इस्लाम स्वीकारण्याची धमकी देत आहेत. याबाबत पीडितेने सहारनपूर पोलिसांना अर्ज दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सहारनपूरच्या गंगोह पोलीस स्टेशन हद्दीतील कुंडकला गावात वाल्मिकी जातीच्या साधुरामच्या कुटुंबाला या धमक्या येत आहेत. अस्लम, नियाज, एजाज, सोनू, आमिर, कामिल, सलीम आणि काला हे साधुरामच्या कुटुंबाला जमीन खाली करण्यासाठी याबाबत पीडितेने सहारनपूर पोलिसांना अर्ज दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सहारनपूरच्या गंगोह पोलीस स्टेशन हद्दीतील कुंडकला गावात वाल्मिकी जातीच्या साधुरामच्या कुटुंबाला या धमक्या येत आहेत. अस्लम, नियाज, एजाज, सोनू, आमिर, कामिल, सलीम आणि काला हे साधुरामच्या कुटुंबाला जमीन याप्रकरणी साधुराम यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली. साधुरामने तक्रारीत म्हटले आहे की, ते १९६७ पासून धालवली शहरात राहतात. तो त्याच्या गावातून इथे आला होता कारण तिथे पूर आला होता. साधुरामने पोलिसांना सांगितले आहे की, ते ज्या जमिनीवर राहत आहेत. ती जमिन बळकावण्याचा प्रयत्न काही कट्टरपंथींकडून केला जात आहे.
साधुरामने अर्जात म्हटले आहे की, “ते धमकी देतात की, एक तर तू आणि तुझ्या कुटुंबाने इस्लाम स्वीकार, अन्यथा ते तुला आणि तुझ्या कुटुंबाला ठार मारतील आणि संपूर्ण जमीन ताब्यात घेतील.” या कट्टरपंथी गुंडांच्या दादागिरीमुळे घरातील इतर सदस्य आधीच घर सोडून वेगवेगळ्या शहरात गेल्याचे पीडितेने म्हटले आहे. कट्टरपंथी गुंडांनी त्यांच्या जमिनींवर कब्जा करण्याबरोबरच गावातील सोसायटीच्या जमिनीही बळकावल्याचा आरोपही साधुराम यांनी केला आहे.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पीडित महिला म्हणाल्या, “आम्ही कुंडकला गावातील आहोत, तिथे आमचे एकमेव घर वाल्मिकींचे आहे. उर्वरित गाव मुस्लिमांचे आहे. आधी त्यांनी मला मारहाण केली, आता त्यांना माझे घर हिसकावून घ्यायचे आहे. ते आम्हाला सांगतात इथून पळून जा नाहीतर मुसलमान व्हा, असे सांगतात. त्यामुळे आम्हाला त्यांच्यापासून खूप धोका आहे.”
साधुरामने असेही सांगितले आहे की,येथे हे कट्टरपंथी गुंड हिंदूंचे धर्मांतर करतात आणि त्यांच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे कब्जा करतात. हिंदू कुटुंबातील महिलांचा विनयभंग होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. साधुरामने या गुंडांवर शस्त्रास्त्र तस्करीचा आरोपही केला आहे. या गुंडांवर कारवाई करण्याची मागणी साधुराम यांनी पोलिस प्रशासनाकडे केली आहे.