मुंबई : दि. २१ जानेवारी रोजी मुंबईत प्रतिष्ठित 'टाटा मुंबई मॅरेथॉन' पार पडली. यामध्ये असंख्य नागरिक उत्साहाने सहभागी झाले. माहिम ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स अशी ही स्पर्धा असून यंदाचे वर्ष हे या स्पर्धेचे १९वे वर्ष आहे. एमएच हेले लेमी बेरहानू याने मुंबई मॅरेथॉनमध्ये चे पुरुष विजेतेपद पटकावले आहे.
आंतरराष्ट्रीय महिला गटात, अबेराश मिनसिवोने या स्पर्धेत अव्वल स्थान पटकावले. दुसरीकडे, हायली लेमीने आंतरराष्ट्रीय पुरुष गटात पहिले स्थान मिळविले. याशिवाय भारतीय पुरुष गटातून श्रिनु बुगाथा सुवर्णपदक जिंकले. तर, महिला गटात ठाकोर निर्माबेन भारतजी अव्वल स्थान पटकावले.
पहाटेपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत ५९ हजार स्पर्धक सहभागी झाले होते. यामध्ये तरुण वर्गापासून तर जेष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच लोक धावले. मुंबई मॅरेथॉन ही क्रीडा स्पर्धेपेक्षाही मुंबईकरांना एकत्र आणणारी चळवळ आहे. ग्लोबी हा टाटा पॉवरचा मेसेंजर आहे आणि सर्वांना “पृथ्वी मातेला आलिंगन द्या” असे सांगत आहे.
टाटा पॉवर उद्दिष्ट अनेक विचारशील उपक्रम आणि धोरणात्मक भागीदारीद्वारे मुंबईला हरित आणि स्मार्ट शहरात रूपांतरित करणे आहे. गुणवत्ता, सुरक्षितता, ग्राहकांचे समाधान आणि नैतिक व्यवसाय पद्धतींवर लक्ष केंद्रित करून, टाटा पॉवर हे शतकाहून अधिक काळ मुंबईला सामर्थ्य देणारे एक विश्वासार्ह नाव आहे.