श्रीकृष्ण जन्मभूमीच्या एएसआय सर्व्हेक्षणाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती!

    16-Jan-2024
Total Views | 234
janmbhumi 
 
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मभूमीवर एएसआय सर्व्हेक्षण करण्याच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिराला लागून असलेल्या शाही इदगाहचे सर्वेक्षण करण्याचे आदेश आयुक्तांना दिले होते.
 
या निर्णयाविरोधात मुस्लीम पक्षाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने अलाहाबाद उच्च न्यायालयाने १४ डिसेंबर २०२३ रोजी दिलेल्या आदेशाला स्थगिती दिली.
 
सर्वोच्च न्यायालयाने आदेशाला स्थगिती दिली असली तरी, उच्च न्यायालयात सुनावणी सुरु ठेवण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे अलाहाबाद उच्च न्यायालयातील सुनावणी सुरुच राहणार आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी २३ जानेवारीला होणार आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
२५ जून : आणीबाणीच्या काळ्या आठवणी जागविण्याचा दिवस

२५ जून : आणीबाणीच्या काळ्या आठवणी जागविण्याचा दिवस

आज आपण सर्वजण स्वातंत्र्याचा अनुभव घेतोय. कोणीही, कधीही, कुठेही जाऊ शकतो, मनासारखे (झेपेल त्याप्रमाणे) काहीही करू शकतो. मग विषय कोणताही असो. ‘कोरोना’चा असो किंवा चिनी घुसखोरीचा, शेतकर्‍यांच्या प्रश्नांचा विपर्यास करण्याचा, दि. २६ जानेवारी रोजीच्या राजधानीत घातलेल्या धुडगुसाचे निर्लज्ज समर्थन करण्याचा, खलिस्तानचे समर्थन करण्याचा, ‘वॅसिन’च्या प्रश्नावर दिशाभूल करण्याचा, स्वतःच्या अकार्यक्षमतेचे खापर निर्लज्जपणे केंद्र सरकारवर फोडण्याचा, केतकीच्या कवितेवरून तिला चार महिने तुरुंगवारी घडविण्याचा आणि मोदींना ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121