"...त्यावेळी आदित्य ठाकरे कुणाबरोबर बर्फात खेळत होते?" शिवसेना प्रवक्त्यांचा सवाल
16-Jan-2024
Total Views | 83
मुंबई : उद्धव ठाकरे आजारी असताना आदित्य ठाकरे कुठल्या बर्फाच्छादित प्रदेशात गेले होते आणि कुणाबरोबर बर्फात खेळत होते? असा सवाल शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला आहे. आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दावोस दौऱ्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना त्यांनी हा सवाल केला आहे. न्युज १८ लोकमतशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले.
नरेश म्हस्के म्हणाले की, "मुख्यमंत्री शिंदे दावोस दौऱ्यावर आपले नातेवाईत, मित्रपरिवार घेऊन गेलेले नाहीत. आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्र्यांवर टीका करण्याचा अधिकार नाही. मागच्या वेळी आदित्य ठाकरे उद्योगमंत्री नव्हते तर ते पर्यटनमंत्री होते. तरीही लहानपणी आपण जसं हट्ट करतो तसा वडिलांकडे हट्ट करुन आदित्य ठाकरे दावोसला गेले असावे. "
"तुम्ही दावोसला गेले होते तेव्हा तुमच्याबरोबर कोण कोण होते, किती नातेवाईक आणि मित्र परिवार होता याची यादी द्या. सर्वात लाजीरवाणी गोष्ट म्हणजे त्यावेळी उद्धव ठाकरे आजारी असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार होती. तुम्ही मोठा मुलगा आहात. त्यामुळे तुम्ही दौरा सोडून परत यायला हवं होतं. पण तुम्ही आला नाहीत. त्यावेळी तुम्ही कुठल्या बर्फाच्छादित प्रदेशात गेलात, कुणाबरोबर बर्फात खेळत होता आणि तिथे कुणाबरोबर गेलात याचं उत्तर तुम्ही देणार का? तुम्ही उद्योगमंत्री नसतानाही दावोस दौऱ्यावर का गेलात? वडिलांचे ऑपरेशन असतानासुद्धा तुम्ही आपला दौरा का लांबवला?" असा सवाल त्यांनी आदित्य ठाकरेंना केला आहे.
तसेच यावेळी नरेश म्हस्केंनी एक मोठा गौप्यस्फोटही केला आहे. "उबाठा गटातील बहुसंख्य आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते आमच्या संपर्कात असून थोड्याच दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करतील. म्हणूनच घाबरून ही महापत्रकार परिषद वगैरे नाटकं सुरु आहेत जेणेकरुन लोकं आपल्याबरोबर थांबावित," असा आरोपही त्यांनी केला आहे.