केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळात नोकरीची संधी!

    29-Sep-2023
Total Views |
Central Pollution Control Board Recruitment

मुंबई :
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ अंतर्गत विविध पदांसाठी नोकरभरती करण्यात येणार आहे. या भरतीसंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळातील रिक्त जागांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळांतर्गत एकूण ७४ रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीच्या माध्यमातून केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळातील सल्लागार ‘ए’, सल्लागार ‘बी’, सल्लागार ‘सी’ पदांच्या एकूण ७४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

सदर भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून उमेदवाराने अर्ज अंतिम मुदत दि. १० ऑक्टोबर २०२३ असणार आहे. या भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे, वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रताबाबत सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

तसेच, भरतीसंदर्भातील अधिक तपशील जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121