"गणपती दर्शनात राजकीय दृष्टीने न पाहिलेलं बरं!"- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    22-Sep-2023
Total Views | 42

aknath shinde


मुंबई :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दादर येथील 'शिवतीर्थ' या निवासस्थानी श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला राज ठाकरे, त्यांचे सुपुत्र अमित राज ठाकरे, मनसे नेते नितीन सरदेसाई तसेच ठाकरे कुटुंबातील अन्य सदस्य उपस्थित होते. राज ठाकरे यांच्या घरातील बाप्पाचे दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

यावेळी ते म्हणाले, राज ठाकरे यांच्यासोबत कोणत्याही राजकीय विषयांवर चर्चा झाली नाही, राजकीय दृष्टीनं हे दर्शन न पाहिलं तर बरं होईल, दरवर्षी मी गणपती दर्शनाला जातो. राज साहेबांकडे देखील गणपती दर्शनाला जातो; असे म्हणत शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. तर राज्यात चांगला पाऊस होऊ दे आणि बळीराजाचं संकट दूर होऊ दे, असे मागणं मागत गणपती बाप्पा महाराष्ट्रावरचं संकट दूर करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

ईको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करा, जिंका ५१ हजारांचे बक्षीस!


दैनिक 'मुंबई तरुण भारत' आयोजित MPCB प्रस्तुत 'MahaMTB घरगुती ecofriendly गणेशा' स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सोबत दिलेल्या लिंकवरील गुगल फॉर्म नक्की भरा!

https://bit.ly/3RpZbSq
अग्रलेख
जरुर वाचा
बकरी ईदला प्राण्यांची कुर्बानी देणार नाही;

"बकरी ईदला प्राण्यांची कुर्बानी देणार नाही"; 'या' मुस्लिम बहुल राष्ट्राने घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या कारण...

(Muslim Country Morocco Bans Animal Sacrifice on Bakrid) आफ्रिकेतील इस्लामिक देश असलेल्या मोरोक्कोमध्ये बकरी ईदच्या दिवशी प्राण्यांच्या कुर्बानी देण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मुस्लिम बहुल राष्ट्र असलेल्या मोरोक्कोचा राजा मोहम्मद सहावा यांनी हा निर्णय घेतला आहे. इस्लाममध्ये बकरी ईदच्या दिवशी कुर्बानी देण्याला खूप महत्त्व देण्यात आले आहे. मोरोक्कोच्या लोकांनी या निर्णयाला विरोध केला आहे. त्यामुळे आता या निर्णयाची जगभरात चर्चा होत आहे. मोरोक्कोतील पशु बाजार बंद करण्यात आले असून राजाने बकरीसह कोणत्याही प्राण्..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121