मुंबई : खासदार सुप्रिया सुळेंनी काल (८ ऑग.) लोकसभेतील भाषणात मणिपुरचा विषय मांडला. त्यांच्या या भाषणाचे ट्विट उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केले. व्हिडीओ ट्विट करत युवराजांनी सुप्रिया सुळेंचं तोंडभरुन कौतुक ही केलं. मात्र, युवराजांना आपल्या खासदाराची दखलही घेता आली नाही, हे पुन्हा एकदा दिसुन आले.
खासदार अरविंद सावंत यांनी कालच्या लोकसभेतील भाषणाचा फोटो ट्विट करत युवराजांना ट्विटमध्ये मेन्शन ही केले. परंतु युवराजांना आपल्याच खासदाराचा विसर पडला. पण युवराज सुळे ताईंना विसरले नाहीत. त्यावर आदित्य ठाकरे ट्विट करत म्हणाले, "महाराष्ट्राच्या खासदार सुप्रियाताई सुळे ह्यांनी आज लोकसभेत केलेले भाषण भारतातल्या प्रत्येकाने ऐकावे असे आहे!"