काय आहे इस्त्रोची संपूर्ण मोहिम? जाणून घ्या..

    31-Aug-2023
Total Views | 54

Aditya L1


मुंबई :
भारताची पहिली सौर मोहिम आदित्य एल-१ लवकरच प्रक्षेपिण होणार आहे. २ सप्टेंबर रोजी सकाळी ११.५० वाजता श्रीहरीकोटा येथून आदित्य एल-१ प्रक्षेपित केले जाणार आहे. चांद्रयान-३ च्या यशानंतर आता आदित्य एल-१ कडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
 
आदित्य एल-१ मधील एल-१ हा सुर्य आणि पृथ्वी यांच्या मध्ये असलेला लांग्रेज पाँईंट आहे. हा पाँईंट पृथ्वीपासून १.५ दशलक्ष किमी अंतरावर असून या पाँईंटवर आदित्य एल-१ प्रक्षेपित करण्यात येणार आहे. हे यान PSLV-C57 द्वारे प्रक्षेपिक केले जाणार आहे. सुर्याला आदित्य असेही म्हटले जाते त्यामुळे या मोहिमेचे नाव आदित्य एल-१ असे ठेवण्यात आले आहे.
 
अंतराळात एल-१, एल-२, एल-३, एल-४ आणि एल-५ असे पाच लांग्रेज बिंदू आहेत. यातील एल-१, एल-२ आणि एल-३ हे बिंदू सूर्य आणि पृथ्वीच्या केंद्रांना जोडणाऱ्या रेषेवर आहेत. एल-१ बिंदू हा पृथ्वी आणि सुर्याच्या मध्ये आहे. याठिकाणी शुन्य गुरुत्वाकर्षण शक्ती आहे. तसेच या बिंदूवर कमी उर्जा असते त्यामुळे हा बिंदू संशोधनासाठी उपयुक्त आहे.
 
लांग्रेज पाँईंटपर्यंत पोहोचण्यासाठी आदित्य एल-१ ला चार महिने लागणार आहेत. वेगवेगळी कक्षा पार करत आदित्य एल-१ आपल्या निश्चित स्थानापर्यंत पोहोचणार आहे. आदित्य एल-१ मोहिमेतून सुर्याचे तापमान, ओझोनचा थर यांसारख्या गोष्टींचा अभ्यास करण्यात येणार आहे.


अग्रलेख
जरुर वाचा
२५ जून : आणीबाणीच्या काळ्या आठवणी जागविण्याचा दिवस

२५ जून : आणीबाणीच्या काळ्या आठवणी जागविण्याचा दिवस

आज आपण सर्वजण स्वातंत्र्याचा अनुभव घेतोय. कोणीही, कधीही, कुठेही जाऊ शकतो, मनासारखे (झेपेल त्याप्रमाणे) काहीही करू शकतो. मग विषय कोणताही असो. ‘कोरोना’चा असो किंवा चिनी घुसखोरीचा, शेतकर्‍यांच्या प्रश्नांचा विपर्यास करण्याचा, दि. २६ जानेवारी रोजीच्या राजधानीत घातलेल्या धुडगुसाचे निर्लज्ज समर्थन करण्याचा, खलिस्तानचे समर्थन करण्याचा, ‘वॅसिन’च्या प्रश्नावर दिशाभूल करण्याचा, स्वतःच्या अकार्यक्षमतेचे खापर निर्लज्जपणे केंद्र सरकारवर फोडण्याचा, केतकीच्या कवितेवरून तिला चार महिने तुरुंगवारी घडविण्याचा आणि मोदींना ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121