चांद्रयान झालं आता मिशन आदित्य! सुर्याकडे झेप घेण्यासाठी इस्रो सज्ज

    30-Aug-2023
Total Views |

Aditya L1


मुंबई :
चांद्रयान-३ च्या यशानंतर आता भारत सुर्यावर पाऊल ठेवणार आहे. सुर्याचा अभ्यास करण्यासाठी येत्या २ सप्टेंबर रोजी आदित्य एल-१ मिशन लाँच करण्यात येणार आहे. त्यापुर्वी भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्त्रोने प्रक्षेपणाची चाचणी पुर्ण केली आहे.
 
इस्त्रोने ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे. "प्रक्षेपणाची तयारी प्रगतीपथावर आहे. प्रक्षेपण चाचणी-आदित्य एल-१ ची अंतर्गत तपासणी पुर्ण झाली आहे," असे इस्त्रोने आपल्या ट्विटमध्ये सांगितले आहे.

 
 
आदित्य एल-१ चे प्रक्षेपण शनिवार, २ सप्टेंबर रोजी होणार आहे. ही भारताची पहिली सौर मोहिम आहे. या मोहिमेत सूर्याचे तापमान, ओझोनचा थर, अतिनील किरणांचा पृथ्वीवर होणारा परिणाम, अवकाशातील हवामानाची गतिशीलता या सगळ्याचा अभ्यास केला जाणार आहे.
 
पृथ्वीपासून १.५ दशलक्ष किलोमीटर अंतरावर असलेल्या लांग्रेज पॉईंटवर आदित्य एल-१ प्रक्षेपित केले जाणार आहे. अंतराळयान इलेक्ट्रोमॅग्नेटिक आणि पार्टिकल डिटेक्टर वापरून फोटोस्फियर, क्रोमोस्फियर आणि सूर्याच्या सर्वात बाहेरील थरांचे निरीक्षण करण्यासाठी सात पेलोड्स घेऊन जाणार आहे.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121