कट्टरपंथीयांना मिरच्या झोंबणारा व्हीडिओ! काश्मीरमध्ये बुरखा घातलेल्या मुली म्हणतायत गणेश वंदना

    22-Aug-2023
Total Views | 345
 kashmir
 
मुंबई : शनिवारी, १९ ऑगस्ट रोजी, ट्विटरवर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हीडिओमध्ये अनेक विद्यार्थिनी गणेश वंदना गाताना दिसत आहेत. हा व्हीडिओ दक्षिण काश्मीरमधील पहलगाम शहरातील उच्च माध्यमिक शाळेचा आहे. ही शाळा सरकारी अनुदानावर चालते.
 
 
व्हीडिओमध्ये दिसत आहे की, एक विद्यार्थीनी गणेश वंदना गात आहे. तर इतर विद्यार्थींनी लक्ष देऊन गणेश वंदना ऐकत आहेत. गणेश वंदनेचे गायन झाल्यानंतर गाणाऱ्या मुलीचे कौतुक करण्यासाठी बसलेल्या मुली टाळ्या वाजवताना आपल्याला व्हीडिओत दिसत आहेत.
 
मुलीने गणेश वंदना गायल्यानंतर गणेशाचे महत्त्व आणि कोणतेही काम सुरू होण्यापूर्वी त्यांचे का पुजन केले जाते हे समजून सांगितलं. काश्मीरमधून आलेल्या या व्हीडिओतील मुलीचे सोशल मिडीयावर कौतुक होत आहे. केंद्र सरकारने ३७० हटवल्यामुळे हे शक्य झालं आहे, असा दावाही एका ट्विटर वापरकर्त्याने केला आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121