राष्ट्रवादीनंतर, आता काँग्रेस ही फुटण्याच्या मार्गावर: केसीआर

    02-Aug-2023
Total Views | 74
 
KCR on Congress
 
 
मुंबई : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव कोल्हापूर दौऱ्यावर असताना त्यांनी एक धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसनंतर महाराष्ट्रात काँग्रेस पक्षही फुटण्याच्या मार्गावर आहे, असं मोठं विधान के चंद्रशेखर राव यांनी केलं आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये मोठी फूट पडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे कोल्हापुरात आले होते. यावेळी मीडियाशी संवाद साधताना त्यांनी हा दावा केला.
 
चंद्रशेखर राव यांनी केलेल्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे. चंद्रशेखर राव म्हणाले, "आमच्या कामाची पद्धत बघुन अनेक पक्षाने आमच्याशी संपर्क साधला. राज्यात बाआरएसचे १४ लाखाहून अधिक पदाधिकारी झालेत." असं ही त्यांनी सांगितलं.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121