कट्टरपंथी १० दिवस आधीपासूनच हल्ल्याची तयार करत होते; 'या' अहवालात धक्कादायक खुलासा

    02-Aug-2023
Total Views | 111
hariyana 
 
चंदीगड : कट्टरपंथीय दंगलखोरांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा मोठ्या प्रमाणावर वापर केला. हिंदुस्तान टाइम्सने प्रकाशित केलेल्या एका अहवालात हल्लेखोरांनी हरियाणाच्या मुस्लिम बहुल नूंह जिल्ह्यामध्ये जलाभिषेक यात्रेवर हल्ला करण्याची योजना कशी आखली याचा खुलासा करण्यात आला आहे.
 
२१ जुलैला, जलाभिषेक यात्रेच्या सुमारे दहा दिवस आधी, कट्टरपंथीयांनी विस्तृत योजना आखत भाविकांवर हल्ला करण्याचा कट रचला होता. कट्टरपंथीयांना पोलिस चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. हल्ल्याची योजना बनवण्यासाठी सभा आयोजित केल्या होत्या. सोबतच व्हॉट्सअॅप ग्रुप देखील बनवण्यात आले होते.
 
२१ जुलै ते ३० जुलै दरम्यान हिंदू मिरवणुकांवर हल्ला करण्यासाठी दगड आणि बाटल्या गोळा करण्याची जबाबदारी गटनेत्यांना देण्यात आली होती. या अहवालात नूह येथील स्थानिक रहिवाशांपैकी एकाचा हवाला दिला आहे जो अशाच एका बैठकीत उपस्थित होता.
 
दंगलखोरांकडून सूड घेण्याच्या भीतीने नाव गुप्त ठेवण्याची विनंती करताना, रहिवाशांनी सांगितले की स्थानिक दुकाने प्रामुख्याने काचेच्या थंड पेयाच्या बाटल्या विकतात, ज्यामुळे त्यांची व्यवस्था करणे सोपे होते. शिवाय, परिसरातील गावकऱ्यांना हल्ल्यासाठी दगडांचा साठा करण्याच्या सूचनाही यापूर्वीच देण्यात आल्या होत्या.
 
आणखी एका रहिवाशाने, ज्याने नाव न सांगण्याची विनंती केली आहे. त्याने सांगितले की, त्याने जमावाला गोळा करण्यासाठी मोटारसायकलची व्यवस्था करण्यात भाग घेतला होता. त्याने पुढे सांगितले की, आम्ही २०० हून अधिक बाईक जमा केल्या. सोबतच गाड्यांचे नंबर दिसू नये म्हणून नोंदणी प्लेट्सला काळ्या रंगाने रंगवले होते.
 
याव्यतिरिक्त, त्यांनी सुमारे ३,००० काचेच्या बाटल्यांची व्यवस्था केली. अधिक परिणामांसाठी काही बाटल्यांमध्ये पेट्रोल भरले होते. या तयार केलेल्या वस्तू नंतर मिरवणुकीला लक्ष्य करण्यासाठी नियुक्त केलेल्या वेगवेगळ्या गटांमध्ये वितरित केल्या गेल्या.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121