ऊर्जा क्षेत्राला अधिक ऊर्जा देणारे ‘मिशन माहिर’

    10-Aug-2023
Total Views | 131
article on Mission Mahir


केंद्र सरकारच्या ऊर्जा व अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाने संयुक्तपणे देशांतर्गत ऊर्जा व वीज निर्मिती-वितरण क्षेत्राशी संबंधित विविध समस्यांचा विशेष अभ्यास करून, त्यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्याच्या दृष्टीने विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. यामध्ये देश ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण करण्याचा समावेश विशेषत्वाने करण्यात आला. याचाच एक भाग म्हणून, ऊर्जा क्षेत्राला उच्च तंत्रज्ञानासह संशोधनाची जोड देऊन देशासाठी म्हणून राष्ट्रीय स्तरावर ’मिशन माहिर’ या उपक्रमाची औपचारिक स्वरुपात सुरुवात करण्यात आली.

वीज व ऊर्जा या बाबी उद्योग-व्यवसायाला चालना देऊन राष्ट्रीय पातळीवर आर्थिक प्रगतीसाठी नेहमीच उपयुक्त व आवश्यक ठरतात. त्यामुळेच या क्षेत्राकडे राज्य व केंद्रीय पातळीवर नेहमीच प्राधान्यपूर्वक लक्ष दिले जाते. सरकारी धोरणांची दिशा त्यावरच आधारित असते. एक धोरणात्मक निर्णय म्हणून कमीतकमी खर्चात ग्राहक म्हणून जनसामान्यांपासून उद्योग-व्यवसाय, सेवा क्षेत्र विभिन्न सरकारी विभागांना वीजपुरवठा करण्यावर भर दिला जातो व त्यासाठी अद्ययावत व प्रगत तंत्रज्ञानावर भर दिला जातो. याच सार्‍या प्रयत्नांचा एक एकत्रित भाग म्हणून, ऊर्जा क्षेत्रात तंत्रज्ञान व संशोधनावर आधारित व नावीन्यपूर्ण कल्पनांना प्रोत्साहन देण्याच्या मुख्य उद्देशाने केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयातर्फे नव्यानेच ’मिशन माहिर’ या नव्या ऊर्जावान उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.

यासंदर्भातील उल्लेखनीय बाब म्हणजे, केंद्र सरकारच्या ऊर्जा व अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाने संयुक्तपणे देशांतर्गत ऊर्जा व वीज निर्मिती-वितरण क्षेत्राशी संबंधित विविध समस्यांचा विशेष अभ्यास करून, त्यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्याच्या दृष्टीने विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. यामध्ये देश ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण करण्याचा समावेश विशेषत्वाने करण्यात आला. याचाच एक भाग म्हणून, ऊर्जा क्षेत्राला उच्च तंत्रज्ञानासह संशोधनाची जोड देऊन देशासाठी म्हणून राष्ट्रीय स्तरावर ’मिशन माहिर’ या उपक्रमाची औपचारिक स्वरुपात सुरुवात करण्यात आली.

तांत्रिक स्वरुपात व शब्दशः सांगायचे म्हणजे ‘माहिर’चा अर्थ होता, ’मिशन ऑन अ‍ॅडव्हान्सड एंड हाय इम्पॅक्ट रिसर्च.’ या शब्दावलीवरूनच या नव्या उपक्रमामागची अद्ययावत व शास्त्रोक्त संकल्पना स्पष्ट होते. या नव्या ‘मिशन’मध्ये केवळ संशोधन-संकल्पना नव्हे, तर त्यांच्या संपूर्ण व यशस्वी अंमलबजावणीवर भर देण्यात आला आहे. त्यादृष्टीने ऊर्जा क्षेत्रात ‘मेक इन इंडिया’ व ‘स्टार्टअप’ या दोन नव्या संकल्पनांसह शून्य वीजगळती यांसारख्या कार्यपद्धतीवर विशेष भर देण्यात आला. याद्वारे संयुक्त राष्ट्र संघाद्वारे निश्चित केलेल्या जागतिक स्तरावरील स्थायी विकास उद्दिष्टांची पूर्तता करण्यावर भविष्यात भर दिला जाईल.
 
व्यापक स्तरावर ‘मिशन माहिर’मध्ये पुढील उद्देशांवर भर देण्यात आला आहे-


* वीजनिर्मिती व ऊर्जा व्यवस्थापन क्षेत्रात नव्या व प्रगत तंत्रज्ञानाचा शोध घेऊन त्यांचा आगामी गरजांच्या संदर्भात अधिकाधिक प्रभावी व परिणामकारक स्वरुपात उपयोग करण्यासाठी प्रोत्साहन देणे.

* ऊर्जा क्षेत्रात निर्मिती-वितरणापासून ऊर्जा संशोधन व व्यवस्थापन संदर्भात काम करणार्‍या सर्व घटक व संस्थांना समाविष्ट करून त्यांना विशेष कार्यपद्धतीसह एकत्र मंच उपलब्ध करून देणे.

* ऊर्जा तंत्रज्ञान-संशोधन क्षेत्रातील प्रगत तंत्रज्ञान संशोधनाला प्रोत्साहन देऊन, त्याला भारतीय स्वरुपातील प्रयत्नांची जोड देणे.

* आवश्यकतेनुसार व आगामी गरजांची पूर्तता करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सामंजस्य करारांसह विशेष प्रयत्न करून त्याद्वारे तंत्रज्ञानाची यशस्वी देवाणघेवाण करणे व परस्पर सहकार्यासह विकास साधणे.

* भारताला ऊर्जा क्षेत्रात अव्वल व जागतिक स्तरावर अग्रणी बनविणे.

वरील धोरण-उद्दिष्टांसह ऊर्जा क्षेत्रातील ’मिशन माहिर’ मध्ये जागतिक पातळीवर असणार्‍या लिथियम-आयन बॅटरीजची टंचाई लक्षात घेता, त्याला पर्याय शोधणे, भारतीय गरजा व खानपान पद्धतीला अनुसरून विजेवर चालणारे कुकर व स्वयंपाक उपकरणांमध्ये सुधारणा घडवून आणणे, इंधन वापरामध्ये हरित इंधनाच्या वापराला अधिकाधिक चालना देणे, ऊर्जा निर्मितीमध्ये कोळशाचा वापर कमीतकमी ठेवणे, अधिकाधिक प्रमाणावर कर्ज गुणांकांची वाढ करणे, शीतगृहांचा उर्जेच्या संदर्भात अधिकाधिक प्रमाणावर कर्ज गुणाकांची वाढ करणे, शीतगृहांचा उर्जेच्या संदर्भात अधिकाधिक कार्यक्षम बनविणे, इलेक्ट्रिक वाहन बॅटरीसाठी अधिकाधिक प्रमाणावर नॅनो तंत्रज्ञानाच्या वापराला प्रोत्साहन देणे व या सार्‍यामध्ये अधिकाधिक स्वरूपात स्वदेशी ज्ञान-तंत्रज्ञानाचा वापर करणे, याप्रमाणे प्राधान्यक्रम ठरविण्यात आला, हे विशेष.

विषयाचे नावीन्य व आवश्यकता लक्षात घेता, ’मिशन माहीर’ची विशेष रचना-यंत्रणा तयार करण्यात आली. त्यानुसार ‘मिशन’ स्तरावर द्विस्तरीय रचना करण्यात आली. त्याप्रमाणे पहिल्या टप्यात ’मिशन माहीर’ची विशेष तंत्रज्ञान समिती गठीत करण्यात आली असून, त्याचे अध्यक्ष केंद्रिय ऊर्जा प्राधिकरणाचे अध्यक्ष असतील. विशेष तंत्रज्ञान समितीच्या अधिकार क्षेत्राल मुख्यतः आंतरराष्ट्रीय स्तरावरील ऊर्जा संशोधन व त्यानुषंगाने आवश्यक अभ्यास, उपयुक्त वीज वापर व व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञानाला प्रोत्साहन, ऊर्जा संशोधनाचा अभ्यास व नियोजन आणि वरील विषयांशी संबंधित कामकाज आणि त्यावरील प्रगतीचा वेळोवेळी अभ्यास करणे इ. चा समावेश होता.

याशिवाय ’माहिर’ची आखणी-अंमलबजावणी सातत्याने व प्रगतीपर पद्धतीने व्हावी, यासाठी केंद्रीय उर्जामंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली आहे. ही समिती वीज उत्पादन व गैर-परंपरागत ऊर्जा निर्माण क्षेत्रांमध्ये आवश्यक असणार्‍या व प्रस्तावित संशोधन प्रकल्प, विशेष तंत्रज्ञानाचा विकास करणे, वर उल्लेख केल्यानुसार असणार्‍या विशेष तंत्रज्ञान समितीच्या माध्यमातून जागतिक पातळीवरील संशोधनाला प्राधान्य देतानाच त्यामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर समन्वय साधणे, यासारखी महत्त्वपूर्ण कामे करील. बंगळुरू येथील ‘सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिट्यूट’ ही संस्था याकामी मध्यवर्ती समन्वय संस्था म्हणून काम करेल.

निश्चित कार्यपद्धतीनुसार ’मिशन माहिर’ अंतर्गत ऊर्जा व वीज निर्मिती क्षेत्रात प्रगत तंत्रज्ञान, वीज उत्पादन, उर्जेचा दर्जा व व्यवस्थापन यासारख्या क्षेत्रातील सुधारणांसह विशेष संशोधन प्रस्ताव व त्याचा तपशील संबंधित विषय तज्ज्ञांकडून मागविला जातो. संशोधन प्रस्तावाचे वैशिष्ट्य व उपयुक्तता याचा प्राथमिक अभ्यास करून राष्ट्रीय पातळीवर वीज निर्मिती व वितरण-व्यवस्थापन क्षेत्रातील कंपन्यांकडे, हे प्रस्ताव पाठविले जातात. यामागे नवीन संशोधन प्रस्तावांचा विविध अंगांनी अभ्यास करणे, हा मुख्य उद्देश असतो.
 
वीज उत्पादन वा वितरण क्षेत्रातील कंपन्या त्यांच्या गरजांनुरूप नव्या संशोधन प्रस्तावांचा विचार करून त्यानुसार प्रतिसाद देतात. संशोधन प्रस्तावांची निवड करताना संबंधित कंपनीच्या व्यावसायिक गरजांशिवाय प्रगत तंत्रज्ञान, व्यावहारिक उपयुक्तता, दूरगामी परिणाम, ग्राहकांना होणारे फायदे इ. वर विचार केला जातो. संशोधन प्रस्तावाची निवड करताना व्यावसायिक संदर्भात व दजार्र्, किंमत उपयुक्तता व दीर्घकालीन फायदे इ. मुद्द्यांचा प्रामुख्याने विचार करून निवड करण्यात येते. अशा प्रकारे निवड झालेल्या संशोधन प्रकल्प व प्रस्तावासाठी त्याच्या आवश्यकतेनुसार व विविध टप्प्यांवर अर्थसाहाय्य उपलब्ध करून दिले जाते.

‘मिहान माहिर’अंतर्गत नव्याने निवड झालेल्या प्रकल्प-प्रस्तावांना त्यांचे स्वरूप व दर्जानुसार सुरुवातीच्या टप्प्यात वा प्रकल्प प्रायोगिक स्वरूपात असताना मर्यादित स्वरूपात अर्थसाहाय्य केले जाते. याचा फायदा वैयक्तिक संशोधकांशिवाय ‘स्टार्टअप’ सारख्या कल्पक व नवागत आस्थापनांना होत असतो व हा या योजनेतील एक महत्त्वाचा उद्देशसुद्धा आहे. संशोधन प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर त्यापोटी उपलब्ध बौद्धिक क्षमता अधिकार ‘सेंट्रल पॉवर रिसर्च संस्थे’कडे असतात व त्याचा फायदा सरकारी व खासगी क्षेत्रातील ऊर्जा क्षेत्रातील कंपन्या व संस्थांना मोठ्या प्रमाणात होत असतो.
 
ऊर्जा क्षेत्रातील या नव्या व ऊर्जावान क्षेत्रातील या कल्पक नवसंकल्पनेच्या संदर्भात केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाचे सचिव अशोककुमार यांच्यानुसार ’मिशन माहिर’ यशस्वी करण्यासाठी त्यांचे मंत्रालय व केंद्र सरकारद्वारे बहुविध स्वरुपात प्रयत्न केले जाणार आहे. याचाच एक मुख्य भाग म्हणून ‘मिशन’द्वारा राष्ट्रीय स्तरावरील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी’, ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’, ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी’ विभिन्न विद्यापीठ व संशोधनसंख्या राज्य व केंद्रीय ऊर्जा मंत्रालय, शास्त्रज्ञ व संशोधक या संस्थांचे एकत्रित व संयुक्त स्वरुपातील सहकार्य घेतले जाणार आहे.

थोडक्यात, पण महत्त्वाचे म्हणजे नजीकच्या काळात देशाचा विकासदर सहा टक्के नेण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर वीज वापरात सुमारे दहा टक्क्यांची वाढ होणे अपेक्षित आहे. विकासाशी निगडित अशी ही उभय उद्दिष्टपूर्ती कालबद्ध स्वरुपात, वाढीव दर्जा, गुणवत्ता पूर्ण वीज उत्पादन, यासाठी विशेष प्रयत्न प्राधान्य तत्त्वावर करण्याची मोठी गरज होती. ही मोठी गरज तेवढ्याच मोठ्या प्रमाणावर व कालबद्ध स्वरुपात पूर्ण करण्यासाठी ’मिशन माहिर’ हा उपक्रम ऊर्जा क्षेत्रासाठी दीर्घकालीन स्वरुपातील आशादायी स्वरुपातील आशेचा किरण ठरणार आहे.



दत्तात्रय आंबुलकर

(लेखक एचआर-व्यवस्थापन सल्लागार आहेत.)


 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121