मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड करत फडणवीस-शिंदे सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गटातील दोन्ही नेते आमनेसामने आले. त्यावेळी अजित पवार यांच्या गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधानसभेतील ४२ आमदारांचे पाठबळ असल्याचा दावा केला. पण अजितदादासोबत गेलेले दोन आमदार आता शरद पवारांच्या गटात परतले आहेत.
दोन्ही गटाकडून आपल्याकडे आमदार असल्याचा दावा केला जात आहे. त्याचवेळी किरण लहामटे आणि अशोक पवार ह्या दोन आमदारांनी घरवापसी करत वाय. बी. सेंटरला दाखल झालेत. तसेच आमच्या खोट्या सह्या घेतल्याचा दावा ही ह्या दोन आमदारांनी केला आहे. तर आजच्या बैठकीच्या नियोजनासाठी खासदार सुप्रिया सुळे या वाय.बी.चव्हाण सेंटर येथे दाखल झाल्या आहेत.
आता पर्यंत किरण लहामाटे ,अशोक पवार,रोहीत पवार,देवेंद्र भुयार,राजेंद्र शिंगणे,अनिल देशमुख,जितेंद्र आव्हाड,बाबा जानी दुर्रानी,शशिकांत शिंदे,बाळासाहेब पाटील ह्या आमदारासह राज्यसभेचे खासदार फौजिया खान ,वंदना चव्हाण,अमोल कोल्हे,श्रीनिवास पाटील हे यशवंतराव चव्हाण सेंटरमधील बैठकीला पोहचलेले आहेत. तसेच अजित पवारांच्या बैठकीला ही २४ आमदार पोहचलेले आहेत.