'गदर २' चित्रपटाचे रामायण आणि महाभारताशी आहे खास कनेक्शन

    28-Jul-2023
Total Views | 39
 
gadar 2






मुंबई :
'गदर' हा चित्रपट २००१ साली आला आणि त्याने प्रेक्षकांची मने कायमस्वरुपासाठी जिंकून एक नवा विक्रम केला. तब्बल २३ वर्षांनी 'गदर' चित्रपटाचा दुसरा भाग 'गदर २' प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून सनी देओल, अमिषा पटेल आणि उत्कर्ष शर्मा यांच्या या चित्रपटाचा दबदबा कायम आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून त्याची चर्चा आणखीनच वाढली आहे. दरम्यान 'गदर २'चा 'रामायण' आणि 'महाभारत'शीही संबंध असल्याचे समोर आले आहे. याचा खुलासा खुद्द चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी केला आहे.
 
दिग्दर्शक अनिल शर्मा म्हणाले की, त्यांनी यापूर्वीही आणि आताही 'महाभारत' आणि 'रामायण'पासून प्रेरणा घेतली आहे. मुलाखतीत त्यांना विचारण्यात आले की 'गदर २' मध्ये सनी देओलने अभिमन्यू चक्रासारख्या अवजड वाहनाचे चाक उचलले आहे. तर उत्कर्ष आणि तो रणांगणात महाभारताप्रमाणे लढताना दिसत आहेत. खरंच हा चित्रपट महाभारतापासून प्रेरित आहे का? असा प्रश्न विचारला असता दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी होकार देत पहिला गदरही रामायणापासून प्रेरित होता. जेव्हा प्रभू राम सीता मातेला वाचवायला जातात. तसाच तारासिंह गदरमध्ये सकीनाला वाचवण्यासाठी जातो, असे म्हटले आहे. त्यामुळे ज्यावेळी तुम्ही हा चित्रपट पाहाल त्यावेळी तुम्हाला संदर्भ लागेल असे ते म्हणाले. 'गदर २' ११ ऑगस्ट २०२३ रोजी देशभरात प्रदर्शित होणार आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121