टेक इनोव्हेशन मोहिमेसाठी रेलिगेअर आणि नॅसकॉम सीओईची भागीदारी

    28-Jul-2023
Total Views | 36
 
Religare
 

टेक इनोव्हेशन मोहिमेसाठी रेलिगेअर आणि नॅसकॉम सीओईची भागीदारी
 
 
 
नवी दिल्ली: रेलिगेअर एंटरप्रायझेस लिमिटेड (आरईएल),देशातील अग्रगण्य वित्तीय सेवा समूह आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी)व कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)क्षेत्रातील आघाडीची संस्था नॅसकॉम सीओई यांनी आरईएलच्या व्यावसायिक प्रक्रिया मजबूत करण्यासाठी धोरणात्मक भागीदारी केली आहे.यामुळे कंपनी भविष्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि नवकल्पनांच्या माध्यमातून सक्षम होईल.या क्षेत्रात दीर्घकालीन मूल्य निर्माण करताना ग्राहकांचा अनुभव वाढवण्यासाठी आणि ऑपरेशनल कार्यक्षमता व डेटा सुरक्षितता वाढवण्यासाठी दोन्ही संस्थांच्या सामूहिक सामर्थ्याचा उपयोग केला जाईल.
 
 
एआय,एमएल एआर व्हीआर,रोबोटिक्स,ब्लॉकचेन,ड्रोन्स आणि आयओटीसारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानामध्ये तज्ज्ञ असलेल्या स्टार्टअप्स आणि लघु,मध्यम उद्योगांची निर्मिती आणि विशाल नेटवर्क उभारणीतील नॅसकॉम सीओईचे कौशल्य रेलिगेअर समूहाला योग्य ठरणारे नवोन्मेषक आणि त्यांचे तंत्रज्ञान उपलब्ध करेल.रेलिगेअर समूह कंपनीच्या विशिष्ट गरजांनुसार तयार केलेल्या संभाव्य व्यावसायिक सहयोगांचा शोध घेणे सुरू ठेवेल आणि एंटरप्राइझ व आर्थिक,बँकिंग क्षेत्राला लाभ देण्यासाठी संभाव्य संधी मिळवण्याचा प्रयत्न करेल.
 
 
यावेळी नॅसकॉम सीओईने हेल्थकेअर इनोव्हेशन चॅलेंजच्या (एचआयसी)पाचव्या आवृत्तीचीही घोषणा केली.आरोग्यसेवा प्रदात्यांना त्यांच्या डिजिटल परिवर्तनाच्या वाटचालीत येणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी सक्षम करण्याचा उपक्रम आहे.रेलिगेअरची केअर हेल्थ इन्शुरन्स लिमिटेड आरोग्य विमा उद्योगासाठी डिजिटल तंत्रज्ञान उपाय आणण्यासाठी नॅसकॉम सीओईसोबत काम करणार आहे.
 
 
या भागीदारीची घोषणा करताना,रेलिगेअर एंटरप्रायझेस लि.च्या कार्यकारी अध्यक्ष डॉ.रश्मी सलुजा म्हणाल्या,“नॅसकॉम सीओईसह आमची भागीदारी ही सर्वंकष वित्तीय सेवा प्रदाता बनण्याच्या आमच्या प्रवासातील महत्त्वपूर्ण मैलाचा दगड आहे.उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या सामर्थ्याचा उपयोग करून नव्या व्यवसायात विस्तार करणे,तसेच व्यावसायिक कामकाज यंत्रणा मजबूत करणे,कार्यक्षमता वाढवणे आणि आमच्या ग्राहकांना व भागधारकांना उत्तम मूल्य प्रदान करणे हे आमचे उद्दिष्ट आहे.ही भागीदारी केवळ आमच्या डिजिटल परिवर्तनाला गती देणार नाही,तर आर्थिक सेवा क्षेत्रातील इतर कंपन्यांनाही या दिशेने वाटचाल करण्यास मदत करेल,असा आमचा दृष्टीकोन आहे.”
 
 
“याशिवाय,भारतात उदयास आलेल्या आणि खास करून भारतासाठी उपाययोजना निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करणार्‍या स्टार्टअप्सना पाठबळ देण्याचा आमचा उद्देश आहे.यामुळे आम्ही आत्मनिर्भर भारत - एक स्वावलंबी आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत राष्ट्र या सरकारच्या संकल्पनेला पाठिंबा देत आहोत. या स्टार्टअप्सना बळ दिल्याने आम्हाला भारत-केंद्रित उपाययोजनांची मालकी आणि देशातील बुद्धिमत्ता टिकवून ठेवता येईल.ज्यामुळे तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रातील आमचे जागतिक नेतृत्व मजबूत होईल.”
 
 
रेलिगेअर आणि नॅसकॉम सीओईमधील धोरणात्मक भागीदारीमध्ये आर्थिक सेवांचे भविष्य घडविण्याचे उद्दिष्ट असलेल्या अनेक प्रमुख उपक्रमांचा समावेश आहे. रेलिगेअर नियमित संपर्कसत्रांद्वारे प्रतिभावान नवोदितांच्या वर्तुळात प्रवेश मिळवेल आणि संभाव्य सहकार्याचा मार्ग खुले होतील. याव्यतिरिक्त, स्टार्टअप्समधील धोरणात्मक गुंतवणुकीच्या संधी ओळखण्यात, नावीन्यपूर्णतेला आणि वाढीला चालना देण्यासाठी रेलिगेअरला फायदा होईल.
 
 
या भागीदारीबाबत नॅसकॉम सीओईचे सीईओ संजीव मल्होत्रा म्हणाले,“रेलिगेअर आणि त्याच्या संस्था संयुक्तपणे विविध मुद्द्यांवर काम करतील आणि स्टार्टअप इकोसिस्टमसह उपाययोजना तयार करतील. ज्याचा एंटरप्रायजेसना प्रभाव पडेल. देशातील तंत्रज्ञान नावीन्यपूर्णतेला प्रोत्साहन मिळेल आणि व्यावसायिक मूल्य निर्मितीलाही चालना मिळेल.”या भागीदारीचा एक भाग म्हणून,रेलिगेअरला दोन सीओई-इनक्युबेटेड स्टार्टअप्सना मार्गदर्शन करण्याची संधीही मिळेल,ज्यामुळे उद्योजकीय प्रतिभेला पाठबळ मिळेल.ही धोरणात्मक भागीदारी रेलिगेअरच्या डिजिटल परिवर्तनाच्या प्रवासाला चालना देईल आणि कंपनीला उद्योगात आघाडीवर ठेवेल.अत्याधुनिक उपाययोनांमुळे ग्राहकांनाही उत्तम सेवा अनुभव मिळेल.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121