नवी दिल्ली : अलाहाबाद उच्च न्यायालयाने ज्ञानवापी संकुलाच्या पुरातत्व सर्वेक्षणास (एएसआय) ३ ऑगस्टपर्यंत स्थगिती दिली आहे.वाराणसी येथील ज्ञानवापी संकुलाचे पुरातत्व सर्वेक्षण करण्याचा आदेश वाराणसी जिल्हा न्यायालयाने दिला होता. त्यास मुस्लिम पक्षाने अलाहाबाद उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती प्रितिंकर दिवाकर यांच्यासमोर प्रकरणाची बुधवार आणि गुरुवार असे दोन दिवस सुनावणी झाली.
यावेळी न्यायालयाने एएसआय सर्वेक्षणास ३ ऑगस्टपर्यंत स्थगिती दिली आहे. न्यायालय याप्रकरणी ३ ऑगस्ट रोजी निर्णय देणार असून त्यानंतर सर्वेक्षण पुढे सुरू ठेवायचे की नाही, याचा फैसला होणार आहे.