'मनातले मुख्यमंत्री' पोस्टर लावणाऱ्या आमदारांना अजितदादांनी मुख्यमंत्र्यांसमोर झापलं!

    24-Jul-2023
Total Views | 49
 
Ajit Pawar
 
 
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी 'मनातले मुख्यमंत्री' अशा आशयाचे होर्डिंग्स लावले होते. त्यामुळे मुख्यमंत्रीपद अजित पवारांना मिळणार का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होत्या. या चर्चांना आता अजितदादांनी पूर्णविराम दिला आहे. 'मनातले मुख्यमंत्री' असे पोस्टर लावणाऱ्या आमदारांना अजितदादांनी झापलं आहे.
 
मुख्यमंत्री पदावरून वक्तव्ये करणाऱ्या मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोरच झापलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानंतर अनिल पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माफी मागितल्याचे समजते आहे. "गल्लीतील कार्यकर्त्यांपासून दिल्लीतील नेत्यांपर्यंत अजित पवार मुख्यमंत्री झाले पाहिजे, अशी इच्छा आहे. पण, त्यासाठी 145 आमदारांचा आकडा गाठण्याची गरज आहे. तो गाठल्यावर अजित पवार राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्री होतील. आता शिंदे सरकारच्या पाठीमागे आम्ही आहोत," असे वक्तव्य अनिल पाटील यांनी केले होते.
 
 
 
यासोबतच अजित पवारांनी अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा अत्राम आणि आमदार अमोल मिटकरी यांनाही मुख्यमंत्री बदलाबाबत वक्तव्ये केल्याने झापले आहे. सरकारमध्ये सहभागी असताना अशा प्रकारची संभ्रम व्यक्त करणारी वक्तव्ये आल्याने अजित पवार नाराज झाले होते. त्यानंतर अजित पवार यांनी त्यांच्या आमदारांना इशारा दिला आहे. मिटकरी यांनी दोन दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत ट्वीट केलं होतं. "मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की..! लवकरच अजितपर्व...", असं अमोल मिटकरी यांनी ट्वीटमध्ये म्हटलं होतं.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121