मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडील खाती इतर मंत्र्याकडे ; कारण जाणून घ्या?

    17-Jul-2023
Total Views | 60
Maharashtra Politics
 
मुंबई : राज्यात खातेवाटप दि. १४ जुलै रोजी झाले. त्यानंतर दि. १७ जुलै रोजी पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेली काही खाती तात्पुरती इतर मंत्र्यांना देण्यात आली. अधिवेशन काळात मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी खालील मंत्र्यांकडे पदभार देण्यात आला आहे.
 
गुलाबराव पाटील यांच्याकडे सामान्य प्रशासन, उदय सामंत यांच्याकडे नगरविकास आणि माहिती तंत्रज्ञान, शंभूराज देसाईंकडे सामाजिक न्याय आणि दिव्यांग, दादा भूसे यांना परिवहन, अब्दुल सत्तारांकडे खनिकर्म आणि दीपक केसरकर यांच्याकडे पर्यावरण खातं देण्यात आलं आहे. हे मंत्री अधिवेशन काळात संबंधित विभागाचे दायित्व सांभाळणार आहेत. सभागृहामध्ये या खात्यांसंदर्भात जे काही प्रश्न उपस्थित केले जातील त्याची उत्तरे या मंत्र्यांकडून दिली जाणार आहेत.


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121