विश्वचषकाची ट्रॉफी पोहचली पँगॉन्ग लेकला; आयसीसीने शेयर केला व्हीडिओ!

    10-Jul-2023
Total Views | 62
world cup
 
मुंबई : एकदिवसीय विश्वचषक २०२३ च यजमानपद भूषवण्यासाठी भारतात जोरदार तयारी सुरू आहे. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेची प्रतिष्ठित ट्रॉफी सध्या वर्ल्ड टूरवर आहे. ही ट्रॉफी 18 देशांमध्ये प्रवास करणार आहे. आणि आज या ट्राफीच आगमन भारतात झालं. विश्वचषक ट्रॉफी लद्दाखच्या लेहमध्ये दाखल झाली आहे.
 
आता लेहमधून ही ट्रॉफी देशातील विविध ठिकाणी जाणार आहे. यानंतर ट्रॉफी ही ट्रॉफी 18 देशांमध्ये प्रवास करणार आहे. शेवटी ही ट्रॉफी अहमदाबादला आणण्यात येईल. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये एकदिवसीय विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे.
 
 
 
लेहमध्ये ट्रॉपी पँगॉन्ग लेक आणि शांती स्तूप येथे नेण्यात आली. यावेळी काढण्यात आलेले ट्राफीची फोटो आयसीसीने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केले आहेत. एकदिवसीय विश्वचषक २०२३ ला ५ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. एकदिवसीय विश्वचषक २०२३ चा पहिला सामना इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात होईल. विश्वचषक २०१९ मध्ये हे संघ अनुक्रमे विजेता आणि उपविजेता होते.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121