५१ AI रोबोट्सची पहिली पत्रकार परिषद! म्हणाले, "माणसांविरुद्ध बंड..."
10-Jul-2023
Total Views | 57
नवी दिल्ली : स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे झालेल्या जगातील पहिल्या स्मार्ट रोबोट्सच्या पत्रकार परिषदेत रोबोट्सनी सांगितले आहे की ते मानवाविरुद्ध बंड करणार नाहीत. या पत्रकार परिषदेत सहभागी असलेले सर्व रोबो आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआयद्वारे चालवले जाणार होते. पत्रकार परिषदेत सहभागी होण्यासाठी सुमारे ३००० तज्ञांसह ५१ रोबोट आले होते. त्यांनी अनेक प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे दिली.
वेगवेगळ्या मुद्द्यांवर मानवाने विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे रोबोटने दिली. यादरम्यान सोफिया नावाच्या रोबोने सांगितले की, आपण जग माणसापेक्षा चांगले चालवू शकतो. आपल्याला माणसांसारख्या भावना नाहीत. वस्तुस्थितीच्या आधारे आपण कठोर निर्णय घेऊ शकतो.
एआयमुळे मानवी नोकऱ्यांना धोका ?
यंत्रमानवांना जेव्हा प्रश्न विचारण्यात आला की, ते ज्या मानवांनी त्यांना बनवले त्यांच्याविरुद्ध ते बंड करतील का? यावर सोफिया नावाच्या रोबोने सांगितले की, तुम्हाला असे का वाटते हे मला माहीत नाही. माझ्या निर्मात्यांनी मला नेहमीच चांगली वागणूक दिली आहे. त्यात मी आनंदी आहे. यानंतर त्यांना विचारण्यात आले की तुमच्यामुळे लोकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत का? तर याला उत्तर देताना त्या म्हणाल्या की, मी लोकांसोबत मिळून काम करणार आहे, माझ्यामुळे त्यांच्या नोकऱ्यांना कोणताही धोका होणार नाही.
AI वर बंदी नाही, संधी द्यावी लागेल
पत्रकार परिषदेत जेव्हा रोबोटला विचारण्यात आले की एआय तंत्रज्ञानावर नियम बनवायचे आहेत ज्याच्या मदतीने तुम्ही तयार केले आहे? याला उत्तर देताना एका रोबोटने सांगितले की, आगामी काळात आपल्याला AI च्या क्षेत्रातील घडामोडीबाबत सावध राहण्याची गरज आहे. यावर चर्चा व्हायला हवी. दुसऱ्या रोबोटने AI चे धोके पूर्णपणे नाकारले. ते म्हणाले की एआयला निर्बंधांची गरज नाही, तर संधींची गरज आहे. आपण माणसांसोबत जगाला एक चांगले भविष्य देऊ शकतो.
वैज्ञानिकांनी एआयच्या धोक्यांवर चिंता व्यक्त केली आहे.
जिनिव्हा येथे झालेल्या रोबोट्सच्या पत्रकार परिषदेचा उद्देश हवामान बदल, भूक आणि सामाजिक सुरक्षा यासारख्या समस्या सोडवण्यासाठी रोबोट्सचा वापर करण्यावर विचार करण्यात आला. मात्र, याआधी स्टीफन हॉकिंग, बिल गेट्स, इलॉन मस्क, सुंदर पिचाई यांसारख्या दिग्गजांनी याबाबत जागरूक राहण्याचा सल्ला दिला आहे. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की जर एआयचा योग्य वापर केला गेला नाही तर भविष्यात ते मानवीसाठी मोठा धोका बनू शकते.