नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वसामान्य जनतेत सहज मिसळतात. याचाचं प्रत्यय आज पुन्हा एकदा आला. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली मेट्रोने प्रवास केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिल्ली विश्वविद्यालयाच्या शताब्दी समारंभाच्या कार्यक्रमाला जात होते. यासाठी त्यांनी दिल्ली मेट्रोने प्रवास केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सामान्य नागरिकांप्रमाणे मेट्रोमध्ये कार्ड स्वाईप करुन प्रवेश केला.
आपल्या मेट्रोप्रवासात त्यांनी प्रवाशांसोबत दिलखुलास गप्पा पण मारल्या. या प्रवासादरम्यान त्याच्या कोचमधील तरुण प्रवाशांना त्यांनी काही मोलाचे सल्ले पण दिले. आपल्या मेट्रो प्रवासाची काही फोटो त्यांनी आपल्या सोशल मिडिया अकाउंटवरून शेयर केले आहेत.
सध्या पंतप्रधानांच्या या मेट्रो प्रवासाची चर्चा सोशल मिडीयावर होत आहे. सोबतच त्यांनी दिल्ली विश्वविद्दयालयाच्या शताब्दी समारंभाच्या कार्यक्रमात देखील भाषण केले. दिल्ली विश्वविद्यालयाच्या आवारात नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीचे लोकार्पण देखील त्यांनी केलं.