मुंबईत झळकले ठाकरे-औरंगजेबाच्या फोटोचे बॅनर!

    22-Jun-2023
Total Views | 1749

Thackeray-Aurangzeb photo banner
 
 
मुंबई : माहीम परिसरात उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर आणि औरंगजेबाचा फोटो असलेले बॅनर्स लागले आहेत. मध्यरात्री अज्ञात इसमाने हे बॅनर्स लावले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पण, आता हे बॅनर्स ठाकरे गटाकडुन उतरवण्यात आले आहेत. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबादच्या खुलताबाद येथे जाऊन औरंजेबाच्या कबरीवर लोटांगण घातले होते.
 
या बॅनर्सवरील भाषा अत्यंत आक्षेपहार्य आहे. औरंग्याच्या थडग्यावर प्रकाश घालतोय मुजरे, मुघली उदात्तीकरणासाठी सोबतीला उद्धवचे हुजरे… शिवरायांची जनता, असं या बॅनर्सवर लिहिलं आहे. तसेच #uddhavthackerayforaurangazeb असा हॅशटॅग या बॅनर्सवर वापरण्यात आला आहे. तसेच या बॅनर्सवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर आणि औरंगजेबाचा फोटो लावण्यात आला आहे.
 
या प्रकरणी अद्याप कोणीही पोलिसात तक्रार केली नसुन पोलिस स्वत:हून अज्ञात व्यक्ती विरोधात एफआयआर दाखल करणार आहेत. तशी माहिती डीसीपींनी दिली आहे. या बॅनर्समुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाई करण्याचा इशाराही डीसीपीने दिला आहे.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121