ठाणे : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि आमदार सुनिल राऊत यांना मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी मयूर शिंदे याला अटक केली आहे. मयूर शिंदे यांच्या अटकेनंतर दिवसभर राजकिय नेत्याकडून वेगवेगळ्या चर्चा पाहायला मिळत असताना शिवसेनेचे समन्वयक आणि प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी आपल्या ट्विटरवर पोस्ट करत पोलखोल केली आहे. कथित धमकी प्रकरणात अटक केलेला मयूर शिंदे हा ठाण्यातील राष्ट्रवादीच्या एकमेव सज्जन मानत असलेल्या नेत्यासोबतचे संबंध काय ? तर मयूर शिंदे यांचे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड याच्यासोबत फोटो असून तो खास माणूस असल्याचे खर आहे का ? असे म्हस्के यांनी ट्विट करून एकप्रकारे खळबळ उडवून दिली आहे.
मागील आठवड्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी तपास करत संजय राऊत यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीला शोधून काढले आहे. या व्यक्तीला कांजूरमार्ग येथून त्याचे नाव मयूर शिंदे असे आहे. मयूर शिंदे याच्या चौकशीदरम्यान नवनवीन खुलासे समोर येत असताना नरेश म्हस्के यांनी ट्विट करून भंडाफोड केला आहे.
मयूर शिंदे यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी क्षेत्रातील असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काही दिवसांपुर्वी प्रवेश केला होता. संजय राऊत यांची सुरक्षा काढून घेतल्याने त्यांना पुन्हा सुरक्षा मिळावी या हेतूने मयुर शिंदे यांनी हा धमकीचा बनाव केल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून कथित धमकी प्रकरणात अटक केलेला मयूर शिंदे हा ठाण्यातील एकमेव सज्जन नेत्याचा अर्थांत जितेंद्र आव्हाड यांचा खास माणूस आहे, हे म्हणत आहेत हे खरे आहे का ? असा सवाल म्हस्के यांनी उपस्थित केला असून आता आव्हाडांच्या अडचणीत देखील वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.