नवी दिल्ली :आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) हा सध्या तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वाधिक चर्चेचा शब्द आहे. आता यांच तंत्रज्ञानाबद्दल फर्म बर्कशायर हॅथवेच्या वार्षिक बैठकीत अब्जाधीश वॉरेन बफेट म्हणाले , एआय सर्व प्रकारचे काम करू शकते. मात्र जेव्हा एखादे तंत्रज्ञान सर्व प्रकारच्या गोष्टी करू शकतो , तेव्हा मला काळजी वाटते. कारण या एआयवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरणार आहोत.त्यामुळे एआय हा मानवाच्या अस्तित्वाला धोका असून अणुबॅाम्बसारखा आहे, असे विधान वॉरेन बफेट यांनी केले आहे.
दरम्यान, इलॉन मस्कने सुद्धा कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) मानवतेच्या अस्तित्वाला धोका असल्याची चिंता व्यक्त केली आहे. तर दुसऱ्या बाजूला कृत्रिम बुद्धिमत्ता काहीही करू शकते, परंतु मानव कसे विचार करतात आणि कसे वागतात याचा शोध लावू शकत नाही. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता हे अणुबॉम्ब बनवण्यासारखे आहे,असे वॉरेन बफेट यांनी सांगितलय.
अणुबॉम्बचा शोध चांगल्या हेतूने शोध लावला गेला होता. मात्र दुसर्या महायुद्धात त्याचा कसा दुरुपयोग होऊ शकतो हे सिद्ध झाले होते. त्यामुळे मानव जो शोध लावतो तो शोध २०० वर्षांनंतर जगासाठी चांगला असला पाहिजे.त्यामुळे एआय संपूर्ण जग बदलेल. पण त्याने हे स्पष्ट केले की कृत्रिम बुद्धिमत्तेने माणूस कसा विचार करतो.तो कसा वागतो हे शोधून काढलेले नाही, असे वॉरेन बफेट म्हणाले.