दादारे, काकारे, मामारे ज्या पक्षासाठी करता त्यांच्यापुढं जाऊन रडा!

- सुषमा अंधारेंची अजित पवारांकडून खरडपट्टी

    12-May-2023
Total Views | 2185
 
Ajit pawar
 
 
मुंबई : सुषमा अंधारेंनी अजित पवारचा उल्लेख करण्यापेक्षा, तिथं शरद पवारांसमोर रडण्यापेक्षा, भावनिक होण्यापेक्षा त्या ज्या पक्षाचं काम बघतात, ज्या पक्षासाठी बाबा रे, काका रे, मामा रे करत आहेत आणि सभा घेत आहेत त्यांच्यापुढं जाऊन रडा. अशी टीका सुषमा अंधारेंवर केली आहे. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर ढसाढसा रडत विरोधी पक्षनेत्यांची तक्रार केली. “माझ्यावर अश्लाघ्य भाषेत टीका होऊनही विरोधी पक्षनेत्यांनी विधानसभेत याबाबत प्रश्न विचारला नाही.” अशी तक्रार सुषमा अंधारेंनी केली. त्यानंतर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सुषमा अंधारे यांच्या तक्रारीला प्रत्युत्तर दिलं आहे.
 
अजित पवार म्हणाले, “सुषमा अंधारे कुठल्या पक्षात आहेत? त्या शिवसेना-ठाकरे गटात आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते उद्धव ठाकरे गटाचे अंबादास दानवे आहेत. मग सुषमा अंधारेंनी अजित पवारचा उल्लेख करण्यापेक्षा, तिथं शरद पवारांसमोर रडण्यापेक्षा, भावनिक होण्यापेक्षा त्या ज्या पक्षाचं काम बघतात, ज्या पक्षासाठी बाबा रे, काका रे, मामा रे करत आहेत आणि सभा घेत आहेत त्या पक्षाच्या विरोधी पक्षनेत्याला सांगितलं पाहिजे.” अशी खोचक टीका अजित पवारांनी केली.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121