शिवसेनेच्या ‘राम’नेही केले ‘जय महाराष्ट्र’

    02-Apr-2023
Total Views | 373
ram gawde

मुंबई
: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरेसुद्धा ज्यांना ’शिवसेनेचा राम’ म्हणत होते, तेच शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख राम गावडे यांनी अखेर शिवसेनेलायांच्यासह  ‘जय महाराष्ट्र’ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे उध्दव ठाकरेंना आणखी एक धक्का बसला आहे.

गावडे यांच्यासोबत त्यांचे समर्थक, गावोगावचे सरपंच-उपसरपंच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुंबईत येत्या ५ तारखेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे. ठाकरे गटातील सर्व जबाबदार्‍यांमधून मुक्त होत असल्याचे पत्र उध्दव ठाकरे यांना ३१ मार्च रोजी पाठविल्याची माहिती गावडे यांनी दिली आहे. खेड तालुक्यातील धानेारे येथील शाखा प्रमुखपदापासून राम गावडे यांनी १९९१ मध्ये राजकीय कारर्किदीस सुरुवात केली. पक्ष संघटनेतील बहुतेक सर्वच पदांवर काम करुन २०१४ पासून तब्बल सहा वर्षे जिल्हाप्रमुख असलेले राम सदाशिव गावडे हे येत्या ५ तारखेला भाजपत प्रवेश करीत आहेत. याबाबतची माहिती खुद्द गावडे यांनी दिली आहे.
 
उध्दव ठाकरे निष्क्रिय

शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणून उध्दव ठाकरे निष्क्रिय ठरले. राज्याच्या सर्वोच्च स्थानी बसूनही सामान्य शिवसैनिकांसह जिल्ह्यातील विकासासाठी काहीच दिले गेले नाही. सतत अवमानाची वागणूक आणि वारंवार बैठका- चर्चा करुनही अंमलबजावणीच होत नसल्याने खेड-आळंदी विधानसभा मतदार संघ तसेच शिरुर लोकसभा मतदार संघातील कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांना न्याय देण्यासाठी आपण भाजपत प्रवेश करीत असल्याचे गावडे यांनी म्हटले आहे.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121