न्युयॉर्क : ‘पॅसिफीक’ महासागराच्या तळाशी 965 किमी लांबीच्या ‘फॉल्टलाईन’मध्ये एक छिद्र आढळले आहे आणि त्यामुळे अमेरिकेच्या किनारपट्टीवर नऊ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप होऊ शकतो, असे मत संशोधकांनी व्यक्त केले आहे. हे छिद्र विनाशकारी भूकंपाची सुरुवात करू शकतं, अशी भिती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. या भूकंपामुळे वायव्येकडील शहरे नष्ट होण्याची भीती आहे.