वाडा : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती आज वाडा तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
वाडा येथे सिध्दार्थ मित्र मंडळाच्या वतीने गेल्या पाच दिवसांपासून जयंती साजरी करण्यात येत आहे.आज सकाळी बाबासाहेबांना सामुहिक वंदन करण्यात आले.त्यानंतर सेवा निवृत्तीवेतन व महिलांसाठी डाॅ. बाबासाहेबांचे योगदान या विषयावर नवनाथ शिंदे यांचे व्याख्यान झाले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्सव समितीचे कार्यकर्त परिश्रम घेत आहेत.
कुडूस पोलीस दूरक्षेत्रासमोर बाबासाहेबांच्या प्रतिमेला निवासी नायब तहसीलदार सुनिल लहांगे, पोलीस निरीक्षक दशरथ पाटील,विजय जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संविधानाच्या प्रतीचे वाटप करण्यात आले.यावेळी रामदास जाधव, डी.जी.भोईर,रमेश भोईर,इरफान सुसे, सचिन जाधव,स्वप्नील जाधव,आनंद भोईर,नितीन जाधव,नरेंद्र मोरे आदी मान्यवरांसह नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.बोधीवृक्ष छाया मित्र मंडळाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
तालुक्यातील चिंचघर, घोणसई, कोने,वडवली, कोंढले, वाडा, उसर व वाडा भाजप कार्यालय आदी अनेक ग्रामपंचायतीत बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले.यावेळी सरपंच, उपसरपंच, सदस्य,ग्रामसेवक व ग्रामस्थ उपस्थित होते.डाॅ. बाबासाहेब आंबेडकर एकता विचारमंच वाडा तालुका यांच्या वतीने भव्य रॅली काढण्यात आली. कुडूस येथे रॅलीची सुरवात होऊन खानिवली,गो-हाफाटा ,कंचाड खंडेश्वरी नाका, शिरीष पाडा, नेहरोली खुपरी डाकिवली फाटा अशी येऊन कुडूस येथे सांगता करण्यात आली.