प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार?, पवार म्हणतात, "तिघात चौथा नको!"

    11-Apr-2023
Total Views | 164
sharad-pawar-on-prakash-ambedkar-mva

मुंबई
: उबाठा गटप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत निवडणूक लढण्याचा चंग बांधला आहे. याला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मात्र, विरोध केला आहे. उद्धव ठाकरेंनी कितीही प्रयत्न केला तरीही प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीत घेण्यासाठी पवार उत्सुक नाहीत. 'एबीपी माझा'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे स्पष्ट केले आहे.
 
"जागा वाटपाचा विचार हा तिनही पक्ष बसून करतील. माझा प्रकाश आंबेडकरांशी चर्चेचा विषय येईल, असे मला वाटत नाही. आता आम्ही आधीच तीन पक्ष आहोत. त्यात आणखी कुणी नको. जे काही एकदोन छोटे पक्ष आहेत. त्यांना टाळून चालणार नाही. रायगड सारख्या भागाचा विचार केला शेकापची पकड दुर्लक्षित करून चालत नाही. त्यामुळे त्यांच्याशी निश्चित चर्चा करायला हवी. मात्र, आता आणखी चौथा पक्ष नको.", अशी स्पष्ट भूमिका शरद पवारांनी घेतली.

मी जागावाटपाबद्दल काही निर्णय घेत नाही. माझ्या पक्षाचे सहकारी घेतात. ते जसा निर्णय घेतील, त्यापद्धतीने पुढील कार्यवाही होते, असेही शरद पवार म्हणाले.

अग्रलेख
जरुर वाचा
मुंबई लोकल अपघात : मृतांचा आकडा ८ वर; वाचा दिवसभरात काय घडलं?

मुंबई लोकल अपघात : मृतांचा आकडा ८ वर; वाचा दिवसभरात काय घडलं?

आठवड्याचा पहिलाच दिवस मध्य रेल्वेसाठी काळा दिवस ठरला आहे. कसारा-सीएसएमटी लोकल मार्गावरून प्रवास करणाऱ्या ८ जणांचा सोमवार दि.९ रोजी रुळावर पडून मृत्यू झाला आहे. कसाऱ्याकडून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमधून नऊ ते दहा प्रवासी खाली पडले आणि त्यापैकी आठ जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवार, दि. ९ रोजी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. "सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास या घटनेची माहिती मिळाली होती. मुंब्रा आणि दिवा रेल्वे स्थानकांदरम्यान ही घडली. फूटबोर्डवर उभ्या असलेल्या या प्रवाशांचा एकमेकांना धक्का लागला आणि ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121