अयोध्या : रामनवमीच्या उत्सवासाठी धर्मनगरी अयोध्याही सज्ज होत आहे. रामनवमीनिमित्त भगवान रामाच्या जयंतीसाठी भाविक मोठ्या संख्येनं अयोध्येत पोहोचत आहेत. अयोध्येत येणार्या भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी योगी सरकारने विविध सेवा-सुविधा उपलब्ध करण्यावर भर दिला आहे. अयोध्या डेपोनं भाविकांसाठी जादा बसेसची सोय केली आहे. ज्यामुळे रामनगरीत येणारे राम भक्त सहजपणे प्रभू रामाच्या नगरीत पोहोचू शकतात आणि रामनवमी उत्सवात सहभागी होऊ शकतात.