मुंबई : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या बेताल वक्तव्यामुळे त्यांचे संसदीय सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. अर्थातच राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. शिवाय त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मोदी आडनावाशी संबंधित बदनामी प्रकरणात सुरत न्यायालयाने राहुल गांधींना दोन वर्षांचा तुरुंगवास आणि १५हजार रुपयांचा दंड ठोठावला होता.
नेमकं प्रकरण काय ?
नीरव मोदी प्रकरणाबद्दल बोलत असताना राहुल गांधींची जीभ घसरली होती. राहुल गांधीची तूर्त दहा हजारांच्या जामीनावर सुटका झाली होती.राहुल गांधींनी मोदी आडनावाच्या समाजाबद्दल वक्तव्य केल्याचे तीव्र पडसाद संसदेतही उमटले. राहुल गांधींविरोधात सत्ताधारी खासदारांनी आंदोलन केले.
ललित मोदी, नीरव मोदी यांनी केलेल्या गैरव्यवहाराबद्दल बोलताना राहुल गांधींनी "सर्वच मोदी चोर असतात," असे वक्तव्य राहुल गांधींनी केले. या प्रकरणात समाजाच्या वकिलांनी राहुल गांधींविरोधात खटला दाखल केला होता. राहुल गांधींनी आपले वक्तव्ये हे ललित आणि नीरव मोदींविरोधात भ्रष्टाचाराविरोधात होते, असे म्हटले आहे. मात्र, राहुल गांधी हे सतत अवमानजनक वक्तव्यांसाठी ओळखले जातात. ते भारतातच नव्हे तर देशाबाहेर जाऊनही देशाचा अवमान करत असतात, असा दावा राहुल गांधींच्या प्रतिवाद्यांनी केला होता.