हे सामर्थ्य् नाशवंत नाही! पराभवानंतर हेमंत रासनेंची पोस्ट चर्चेत!

    02-Mar-2023
Total Views | 274
 
Hemant Rasane Tweeter post
 
पुणे : कसबा पोटनिवडणुकीत पराभवानंतर हेमंत रासनेंची पोस्ट चर्चेत आली आहे. "हे सामर्थ्य् नाशवंत नाही!" असे म्हणत त्यांनी ट्विटरवर एक पोस्ट व्हायरल केली आहे.पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे रवीेंद्र धंगेकर मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत. तर भाजपचे हेमंत रासने यांना पराभवाचा धक्का बसला आहे. दुसरीकडे चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपने आपला बालेकिल्ला कायम ठेवला असून अश्विनी जगताप यांचा मोठा विजय झाला आहे. अश्विनी जगताप यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांचा दारुण पराभव केला आहे.
 
 
 
हेमंत रासने यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, "कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या पाठिशी मतदानरुपी उभे राहणाऱ्या प्रत्येक मतदाराचे मनःपूर्वक धन्यवाद! कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत मतदारांनी दिलेला कौल मी नम्रपणे स्वीकारतो. या द निवडणुकीत भारतीय जनता पार्टीह महायुतीच्या सर्व घटकपक्षांचे वरीष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी जीवाचं रान केलं, मात्र अपेक्षित यशाने हुलकावणी दिली. संघटना नाही, तर मी वैयक्तिकदृष्ट्या कमी पडलो, ही माझी भावना आहे."
 
"विजय आणि पराजय या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. भारतीय जनता पार्टीने आजवर अनेक विजय मिळवले, अनेक पराभव पदरी पडले. पण पार्टीचे कार्यकर्ते कधीही खचून गेले नाही, जाणारही नाही. याही अपयशाने आम्ही कोणीही खचणार नाही. निश्चितच नव्याने भरारी घेऊ ! कसब्यात भारतीय जनता पार्टीसह मी आपल्या सेवेत सदैव तत्पर आहे. आपण नेहमीप्रमाणे कधीही हाक देऊ शकता!"
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121