नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने ‘गर्वी गुजरात’ ही विशेष यात्रा चमकत्या गुजरातचा सांस्कृतिक आणि अध्यात्मिक वारसा ‘भारत गौरव वातानुकूलित रेल्वेगाडी’च्या माध्यमातून प्रदर्शनीय स्वरूपात समोर आणण्याचा उपक्रम आखला आहे. ‘आयआरसीटीसी’ चालवणार असलेली ही विशेष पर्यटन रेल्वे दि. २८ फेब्रुवारी रोजी दिल्लीच्या सफदरजंग रेल्वे स्थानकांवरून आठ दिवसांच्या प्रवासाला निघणार आहे. गुरुग्राम, रेवरी, रिंगासं, फुल्लेरा आणि अजमेर रेल्वे स्थानकामध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेत चढण्याची आणि उतरण्याची सुविधा उपलब्ध आहे.
३५ ० ० किलोमीटर प्रवासाचा टप्पा!
थोर स्वातंत्र्यसेनानी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या आयुष्यावरील संकल्पनेतून साकारलेल्या भारत सरकारच्या ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ योजनेअंतर्गत या रेल्वेची संरचना केली आहे. या संपूर्ण प्रवासात रेल्वेगाडीचा पहिला थांबा केवडिया येथे दिला असून ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ हे याठिकाणी मुख्य आकर्षण ठरणार आहे. ही संपूर्ण रेल्वेगाडी आठ दिवसांच्या आपल्या प्रवासात साडेतीन हजार किलोमीटर प्रवासाचा टप्पा गाठणार आहे.
जगातील सर्वांत उंच पुतळा ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’, युनेस्कोने जागतिक वारसा प्रदान केलेले चंपानेर पुरातत्व उद्यान, अधलज इथली पायर्या असलेली विहीर, अहमदाबादचे अक्षरधाम मंदिर, साबरमती आश्रम, मोढेरासूर्य मंदिर आणि पटण हे युनेस्कोची वारसा दर्जा लाभलेली ‘रानी की वाओ’ हे या प्रवासादरम्यान इतर मुख्य आकर्षण आहेत. याशिवाय सोमनाथ ज्योतिर्लिंग, नागेश्वर ज्योतिर्लिंग, द्वारकाधीश मंदिर आणि बैत द्वारका या धार्मिक स्थळांनाही या प्रवासात भेट दिली जाणार आहे. या प्रवासात दोन दिवस अनुक्रमे केवडिया आणि अहमदाबाद इथल्या हॉटेलमध्ये मुक्काम असणार आहे, तर सोमनाथ आणि द्वारका इथे दिवसाच्या मुक्कामा दरम्यान भेट दिली जाणार आहे.
उत्कृष्ट प्रतीच्या या वातानुकूलित प्रवासी रेल्वे गाडीमध्ये दोन उत्कृष्ट प्रतीची उपहारगृह, एक आधुनिक स्वयंपाकघर, रेल्वे डब्यांमध्ये शॉवर क्युबिकल्स, सेन्सर असलेली न्हाणीघर, फूट मसाजर यांसारखी काही विस्मयकारक वैशिष्ट्य पुरवण्यात आली आहेत. या संपूर्ण वातानुकूलित असलेली रेल्वे गाडीत दोन प्रकारच्या निवासी सोयी उपलब्ध असतील. प्रथम श्रेणी वातानुकूलन आणि द्वितीय श्रेणी वातानुकूलन, या रेल्वेगाडीत अत्याधुनिक पद्धतीची सुरक्षा व्यवस्था तसेच, ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे आणि प्रत्येक डब्यात सुरक्षारक्षक उपलब्ध असतील. संपूर्ण रेल्वेगाडी माहिती आणि मनोरंजन प्रणालीने युक्त असेल.
भारत सरकारच्या ‘देखो अपना देश’ या उपक्रमाच्या माध्यमातून देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने ‘भारत गौरव प्रवासी गाडी’ची सुरुवात झाली आहे. या प्रवासाची द्वितीय श्रेणी वातानुकूलित डब्याच्या आसनांचा दर प्रत्येकी ५२ हजार २५ ० रुपये, प्रथम श्रेणी वातानुकूलित डब्याच्या आसनांचा दर (केबिन) प्रत्येकी ६७ हजार, १४ ० रुपये, तर प्रथम वातानुकूलित डब्याच्या आसनांचा दर (कूप) प्रत्येकी ७७ हजार, ४ ० ० रुपये असा असणार आहे. ‘आयआरसीटीसी’ पर्यटन रेल्वेगाडीचा संपूर्ण प्रवास आठ दिवसांचा राहणार आहे. या समाविष्ट दरात वातानुकूलित हॉटेलमध्ये रात्रीचे वास्तव्य, बसमधून लगतच्या प्रेक्षणीय स्थळांना भेटी, संपूर्ण कालावधीत जेवण (फक्त शाकाहारी), प्रवासी विमा, मार्गदर्शक अर्थात ‘गाईड’ची सेवा याचा समावेश असेल.
हा प्रवास जास्तीत जास्त लोकांपर्यंत अत्यंत आकर्षक आणि माफक दरात पोहोचविण्याच्या उद्देशाने ‘आयआरसीटीसी’ने देय प्रदान रचना (Payment gateway) तसंच मासिक हप्यांच्या माध्यमातून प्रवासाचा खर्च विभाजित होईल, अशी सोय केली आहे. याबाबत अधिक तपशील जाणून घेण्यासाठी ‘https://www.irctctourism.com या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आरक्षण प्रथम येणार्याला प्रथम प्राधान्य या तत्वावर ‘आयआरसीटीसी’च्या संकेतस्थळावर ऑनलाईन उपलब्ध असणार आहे.
वैशिष्ट्ये
- चमकत्या गुजरातचा वारसा प्रदर्शनीय स्वरूपात मांडण्यासाठी ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ योजनेच्या धर्तीवर या रेल्वे गाडीचे आरेखन
- उत्कृष्ट प्रतीची भारत गौरव डीलक्स वातानुकूलित पर्यटन ट्रेनमध्ये प्रथम आणि द्वितीय श्रेणी असून आठ दिवसांचा प्रवास
- या पर्यटन रेल्वेगाडीत प्रथम श्रेणीचे चार डबे, द्वितीय श्रेणीचे दोन डबे एक संपूर्णपणे सुसज्ज पॅन्ट्री डबा आणि दोन उपहारगृहे, १५६ प्रवासी आसन क्षमता
- महत्त्वाची पर्यटन स्थळे आणि गुजरातच्या वारसा स्थळांचा समावेश
- ग्राहकांसाठी सुलभ मासिक हत्यांद्वारे प्रदान करण्याच्या हेतूने सुलभ देय रचना (पेमेंट गेटवे) उपलब्ध