तृयीयपंथी विद्यार्थ्यांना मिळणार मोफत शिक्षण; चंद्रकांत पाटील यांची घोषणा

संपूर्ण शैक्षणिक शुल्क विद्यापीठे भरणार

    05-Dec-2023
Total Views | 40
Cabinet Minister Chandrakant Patil
 
मुंबई : विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयांत शिक्षण घेणाऱ्या तृयीयपंथी विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याची घोषणा उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवार, दि. ५ डिसेंबर रोजी केली. त्याचप्रमाणे नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीला अधिक गती देण्याची सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केली.

मुंबईतील डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीसंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. निपुण विनायक, उपसचिव अजित बाविस्कर, उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तृयीयपंथी विद्यार्थ्यांची संपूर्ण शैक्षणिक फी (शैक्षणिक शुल्क) विद्यापीठाने स्वनिधीतून भरावी आणि या विद्यार्थ्यांना मोफत उच्च शिक्षण उपलब्ध होईल यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मंत्री पाटील यांनी या बैठकीत केले. या आवाहनाला प्रतिसाद देत सर्व कुलगुरूंनी बहुमताने हा निर्णय मान्य केला. त्यामुळे यापुढे तृतीयपंथी विद्यार्थ्यांना विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयात मोफात उच्च शिक्षण घेता येणार आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, १८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक नवमतदारांची नोंदणी व्हावी, यासाठी निवडणूक विभागाच्या वतीने नवमतदार नोंदणी मोहिम विद्यापीठ आणि महाविद्यालयात राबविण्यात यावी. त्यामुळे महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची मतदार नोंदणी होईल. यासाठी राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) टीमने पुढाकार घ्यावा.
 
परीक्षा न घेता प्रमाणपत्र कोर्स तयार करा!

नँक मूल्यांकन, आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रम, कौशल्याभिमुख अभ्यासक्रम, उद्योजकांचा सहभाग, क्लस्टर महाविद्यालये, मातृभाषेतून शिक्षण, सीबीसीएस पद्धती, एबीसी प्राध्यापक भरती, प्रशिक्षण,सायबर गुन्हे, शैक्षणिक वेळापत्रक व गुणांकन कार्यपद्धतीचे अचूक नियोजन करावे, अशी सूचना बैठकीत केली आहे. विविध स्तरांवर उच्च व तंत्र शिक्षणापासून काही विद्यार्थी दूर राहतात. त्यांच्या मनात परीक्षेची भीती असते. या विद्यार्थ्यांसाठी ऑडिओ-व्हिज्युअल, उद्योगक्षेत्र यांची मदत घेऊन परीक्षा न घेता प्रमाणपत्र कोर्स तयार करता येईल का, याचाही विचार विद्यापीठाने करावा. तसेच नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणी बाबत कालबद्धपद्धतीने नियोजन करून अंमलबजावणी करावी, दिरंगाई करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची विद्यापीठानी खबरदारी घ्यावी, असे निर्देश दिले आहेत.
- चंद्रकांत पाटील, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री

अग्रलेख
जरुर वाचा
पागडीच्या इमारतींच्या स्वयंपुनर्विकासाचा प्रश्न येत्या

पागडीच्या इमारतींच्या स्वयंपुनर्विकासाचा प्रश्न येत्या

स्वयंपुनर्विकास म्हणजे फार मोठी टेक्नॉलॉजी नाही. विकासकावर अवलंबून न राहता रहिवाशांनी स्वतःची इमारत स्वतः उभी केली पाहिजे. दक्षिण मुंबईतील पागडीच्या इमारतींच्या स्वयंपुनर्विकासाचा प्रश्न येत्या एक-दीड महिन्यात मार्गी लावू, असा शब्द भाजपा विधानपरिषद गटनेते तथा मुंबई बँकेचे अध्यक्ष आणि स्वयंपुनर्विकास अभ्यासगटाचे अध्यक्ष प्रविण दरेकर यांनी रहिवाशांना दिला. रुपेश फाऊंडेशन आणि मुंबई बँकेच्या संयुक्त विद्यमाने डोंगरी येथे आयोजित केलेल्या ‘स्वयंपुनर्विकास मार्गदर्शन’ शिबिरात दरेकर मार्गदर्शन करीत होते...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121