आदिनाथ कोठारेने '८३' चित्रपटाचा सांगितला खास किस्सा, म्हणाला, "त्यादिवशी बाबांना माझा अभिमान..."
19-Dec-2023
Total Views | 39
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाने भारतातील प्रत्येक नागरिकाची छाती अभिमानाने फुलून येईल अशी कामगिरी १९८३ साली विश्वचषकावर देशाचे नाव कोरत केली होती. क्रिकेट संघातील प्रत्येक खेळाडूने किती परिश्रम केले होते, त्यांची आर्थिक, मानसिक स्थिती कशी होती हे सारं काही ‘८३’ या चित्रपटात दाखवण्यात आले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान यांनी केले होते. ‘८३’ चित्रपटाचा भाग होण्याची संधी मराठमोळा अभिनेता आदिनाथ महेश कोठारे याला मिळाली होती. नुकताच त्याचा पंचक चित्रपटाचा ट्रेलर लॉंच झाला. यावेळी महाएमटीबीशी बोलताना त्याने ‘८३’ चित्रपटाचा एक खास खिस्सा सांगितला.
...आणि वडिलांना माझा अभिमान वाटला!
“ कबीर खान दिग्दर्शित ‘८३’ हा चित्रपटाच्या प्रिमीयर शो ला मी आई आणि वडिलांना घेऊन गेलो होतो. त्यावेळी तिथे १९८३ साली ज्या भारतीय क्रिकेटपटूंनी विश्वचषका वर्ल्डकप जिंकला होता ते सर्व खेळाडू उपस्थित होते. चित्रपटामुळे माझे वडिल त्यांच्या आवडीच्या सर्व खेळाडूंनी भेटू शकले. त्यानंतर बाबा माझ्याकडे येऊन मला म्हणाले की आज माझ्यासाठी हा क्षण फार अभिमानाचा आहे. कारण मी जेव्हा स्वत:ची ओळख त्यांना करुन देत होतो, तेव्हा माझी ओळख आदिनाथ कोठारेचा बाबा अशी करुन देत होतो. आणि ही बाब माझ्यासाठी फार अभिमानास्पद होती”.