वायू प्रदूषण टाळण्यासाठी रस्त्यांवर पाण्याचा मारा करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश

    09-Nov-2023
Total Views | 30
 
Shinde
 
 
मुंबई : मुंबईतील प्रदूषण रोखण्यासाठी मुंबईतील सर्व रस्ते धुतले जाणार आहेत. यासाठी मनपाला सूचना देण्यात आल्या आहेत. वर्षा बंगल्यावर पार पडलेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचना दिल्या आहेत. दिल्लीपाठोपाठ मुंबई प्रदूषित शहर बनते आहे. वाढते प्रदुषण रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या आहेत. या बैठकीत वायू प्रदूषण टाळण्यासाठी आणि धूलिकण कमी करण्यासाठी पाण्याचा मारा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या साठी टँकरची व्यवस्था करण्यात यावी तसेच पालिकेच्या कर्मचाऱ्यांचे विशेष पथक देखील तयार करण्याच्या सूचना शिंदेंनी दिल्या.
 
एकनाथ शिंदे म्हणाले, " प्रदूषण विरोधी मोहीम लोकचळवळ झाली पाहिजे. धूलिकण कमी करण्यासाठी बांधकाम प्रकल्पाच्या तहीयाणी स्मॉग गन स्प्रिंकलर बसवण्यात यावे. एमएमआरडीएच्या बांधकाम साईट धुळमुक्त करा. या सोबतच अर्बन फॉरेस्टवर भर द्यावा. मुंबईतील रस्ते धूळमुक्त करण्यासाठी मुंबई महापालिकेने विशेष पथके तयार करावी. या साठी वॉटर टँकरची संख्या वाढवावी. मुंबईतले प्रमुख रस्ते पाण्याने धुण्यात यावे, यामुळे धूलिकण कमी होऊन प्रदूषण कमी होईल. विविध बांधकाम साईट वर प्रदूषण रोखण्यासाठी ज्या मार्गदर्शक सूचना आहेत, त्याचे काटेकोरपणे पालन केले जावे. दोन दिवसांआधी मुख्य सचिवांच्या उपस्थितीत मुंबई आणि आजूबाजूच्या पालिका आयुक्तांची बैठक पार पडली होती, ज्यात आयुक्तांना तातडीनं उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्याची अंबलबजावणी व्हावी." असं शिंदे म्हणाले.
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
पंतप्रधान मोदींकडून अहमदाबादमधील दुर्घटनास्थळाची पाहणी, रुग्णालयातील जखमींची घेणार भेट

पंतप्रधान मोदींकडून अहमदाबादमधील दुर्घटनास्थळाची पाहणी, रुग्णालयातील जखमींची घेणार भेट

(Ahmedabad Plane Crash updates) अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनसाठी उड्डाण केलेलं एअर इंडियाचे विमान गुरुवारी दि. १२ जून दुपारी नागरी वस्तीत कोसळले. या भीषण विमान अपघातात एकूण २६५ लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये वसतीगृहातील राहणाऱ्या डॉक्टर आणि विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादमध्ये दाखल झाले असून त्यांनी सर्वप्रथम दुर्घटनास्थळी जाऊन संपूर्ण परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू, गुजरातचे ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121