ठाणे : कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांच्याकडून ठाणे जिल्ह्यातील ८५ शाळांना `डिजिटल दिवाळी भेट' मिळाली आहे. आमदार निधीतून जिल्ह्यातील शाळांना डिजिटल शैक्षणिक साहित्य उपलब्ध करण्यात आल्यामुळे, विद्यार्थ्यांना पारंपरिक पद्धतीबरोबरच नव्या तंत्रज्ञानाचे शिक्षणही मिळणार आहे.
आ. निरंजन डावखरे यांनी आमदारपदाच्या कारकिर्दीत कोकणातील शाळा डिजिटल करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार २०२२-२३ च्या आमदार निधीतून ठाणे जिल्ह्यातील ८५ शाळांना डिजिटल साहित्याचे वाटप करण्यात आले. भाजपाच्या ठाणे, कल्याण आणि भिवंडी येथील कार्यालयात बुधवारी झालेल्या कार्यक्रमात ठाणे जिल्ह्यातील शाळांचे पदाधिकारी व मुख्याध्यापकांकडे साहित्य प्रदान करण्यात आले. या साहित्यामुळे विद्यार्थ्यांना डिजिटल पद्धतीने शिक्षण घेता येईल. तसेच इंटरनेटच्या मदतीने जगभरातील ज्ञान मिळू शकेल.
ठाण्यात झालेल्या कार्यक्रमाला आ. निरंजन डावखरे यांच्याबरोबरच आ. संजय केळकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, माजी गटनेते मनोहर डुंबरे, हिरवळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष किशोरभाई धारिया, सरचिटणीस मनोहर सुखदरे, भाजपाच्या पदवीधर प्रकोष्टचे संयोजक सचिन मोरे आदींची उपस्थिती होती.
भिवंडीतील कार्यक्रमाला भाजपाचे शहराध्यक्ष अॅड. हर्षल पाटील, महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेचे अध्यक्ष सुधीर घागस, सरचिटणीस विशाल पाठारी, यशवंत टावरे, अॅड. प्रवीण मिश्रा, सौ. नीलिमा डावखरे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.कल्याण येथील कार्यक्रमाला भाजपाचे शहराध्यक्ष वरुण पाटील, कल्याण जिल्हा भाजपा सरचिटणीस प्रेमनाथ म्हात्रे, शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक विकास पाटील, शिक्षक आघाडीचे कल्याण संयोजक सुभाष सरोदे, कार्यालय मंत्री डॉ. आशिष पावसकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.