भारताच्या परकीय चलनाच्या गंगाजळीत वाढ; लवकरच ६०० अब्ज डॉलर्सचा आकडा पार होणार?
25-Nov-2023
Total Views |
मुंबई : १७ नोव्हेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात देशाचा परकीय चलन साठा ५.०८ अब्ज डॉलर्सने वाढून ५९५.४० अब्ज झाला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) शुक्रवारी ही माहिती दिली. रिझर्व्ह बँकेच्या साप्ताहिक आकडेवारीनुसार, १७ नोव्हेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठ्याचा एक महत्त्वाचा भाग असलेल्या विदेशी चलन मालमत्ता ४.३९ अब्जने वाढून ५२६.३९ अब्ज झाली आहे.
ऑक्टोबर २०२१ मध्ये देशाच्या परकीय चलनाच्या साठ्याने ६४५ अब्ज डॉलर्सचा उच्चांक गाठला होता. पण गेल्या वर्षी, जगभरात आर्थिक अस्थिरतेच्या दबावामुळे, आरबीआय ने रुपयाच्या विनिमय दरातील घसरण थांबवण्यासाठी या भांडवली राखीव निधीचा वापर केला, ज्यामुळे परकीय चलनाच्या साठ्यात घट झाली.आकडेवारीनुसार, स्पेशल ड्रॉइंग राइट्स (एसडीआर) 120 दशलक्षने वाढून १८.१३ अब्ज डॉलर्स झाले आहेत. भारताच्या परकीय चलनात सातत्याने वाढ होत आहे.