मुंबई : यंदाचे वर्ष हिंदी, मराठीसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसाठी उत्तम गेले. प्रत्येक भाषेतील २-३ चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई केली. याशिवाय चित्रपटातील प्रत्येक कलाकारांनी देखील उल्लेखनीय कामगिरी केली. अशातच आता IMDb ने २०२३ या वर्षातील सर्वाधित लोकप्रिय भारतीय कलाकारांची यादी जाहीर केली असून या यादीत अभिनेत्री आलिया भट्ट ही दुसऱ्या क्रमांकावर असून दीपिका तिसऱ्या क्रमांकावर आहे.
२०२३ मधील या सर्वाधिक लोकप्रिय भारतीय कलाकारांच्या IMDb च्या यादीत दाक्षिणात्य कलाकारांचा देखील विशेष समावेश आहे. या यादीत पहिल्या क्रमांकाचे स्थान किंग खान अर्थात शाहरुख खान याने पटकावले आहे. या वर्षात पठाण आमि जवान असे दोन सुपरहिट चित्रपट त्याने दिले असून त्याचा वर्षाच्या शेवटी डंकी चित्रपट देखील येत आहे.
पाहा संपूर्ण यादी-
१- शाहरुख खान
२- आलिया भट्ट
३- दीपिका पादुकोण
४- वामिका गब्बी
५- नयनतारा
६- तमन्ना भाटिया
७- करीना कपूर
८- शोभिता धुलिपाला
९- अक्षय कुमार
१०-विजय सेतूपती